मैत्रीचा ओलावा जपणारा मंत्री – जयकुमार गोरे
बी. एम. काळे
पुरंदर, दि. १३ ग्रामविकासमंत्री मंत्री जयकुमार गोरे यांनी शासकीय दौर्यावर असताना देखील मैत्रीचा ओलावा जपल्याचे निदर्शनास आले.
नुकतेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी तळाची पाहणी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी शासकीय दौरा नीरा पासून ते सासवड पर्यंत केला या वेळी शासकीय फौजफाटा असताना सासवड येथे भारतीय जनता पक्षाचे युवा आघाडी चे प्रदेश सचिव व जयकुमार गोरे यांचे जुने सहकारी मित्र श्रीकांत ताम्हाणे यांचे सासवड येथील कार्यालयात भेट दिली ही अनौपचारिक भेट असली तरी तालुक्यात या गोष्टीची प्रचंड चर्चा झाली असून या मुळे जुन्या परिवारातील कार्यकर्ते यांचे मध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे. या वेळी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल हे देखील उपस्थित होते