आता झेडपी चे ७३ गट आणि १४६ गण
प्रतिनिधी
पुणे, दि. १२ राज्य शासनाने पुणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी यापूर्वी 2022 मध्ये निश्चित केलेली गट- गण रचना अंतिम केली असून, त्यासंदर्भातील अद्यादेश जाहिर केला आहे. या नवीन गट गण रचनेनुसार आता पुणे जिल्हा परिषदेचे ७३ गट व १४६ गण निश्चित केले आहेत.
यामध्ये गावे महापालिका हद्दीत समाविष्ट झाल्याने हवेली तालुक्यातील ७ गट कमी झाले असून, नवीन गट रचनेत जुन्नर, खेड, भोर, दौंड आणि इंदापूर तालुक्यात प्रत्येकी एक गटांची वाढ झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील हवेली आणि मुळशी तालुक्यातील २३ गावे म्हणजे तब्बल अडीच लाख पेक्षा अधिक ग्रामीण लोकसंख्या महापालिका हद्दीत समाविष्ट झाली आहे. यामुळे पुणे जिल्ह्याची ग्रामीण लोकसंख्या कमी झाल्याने गटाची २ व गणांची संख्या ४ ने कमी झाली आहे. तर हवेली तालुक्यातील गट संख्या तब्बल ७ ने कमी झाली आहे.
यामुळेच नव्याने कोणत्या तालुक्यात गट-गण वाढवता येतील याबाबत संबंधीत सर्व अधिका-यांची बैठक घेऊन नवीन नियमानुसार तालुकानिहाय ७३ गट व १४६ गणांची संख्या निश्चित केली आहे. यामध्ये लोकसंख्येची सरासरी काढून हे गट निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये जुन्नर, खेड, भोर, दौंड आणि इंदापूर तालुक्यात गट संख्येत वाढ झाली आहे. या तालुक्यात गट-गणांच्या रचनेत मोठे फेरबदल होणार असल्याचे स्पष्ट झाले.
जुन्नर- ८ गट १६ गण
आंबेगाव- ५ गट १० गण
शिरूर- ७ गट १४ गण
खेड- ८ गट १६ गण
मावळ- ५ गट १० गण
मुळशी- ३ गट ६ गण
हवेली- ६ गट १२ गण
दौंड- ७ गट १४ गण
पुरंदर- ४ गट ८ गण
वेल्हा- २ गट ४ गण
भोर- ४ गट ८ गण
बारामती- ६ गट १२ गण
इंदापूर- ८ गट १६ गण
एकूण ७३ गट आणि १४६ गण