यशवंतराव चव्हाण कला क्रीडा स्पर्धा ठरल्या केवळ फार्स !
यशवंतराव चव्हाण कला क्रीडा स्पर्धा ठरल्या केवळ फार्स !
स्पर्धेच्या दिवशीच निकाल जाहीर करुन यशस्वी स्पर्धकांना ट्रॉफी,प्रशस्तिपत्रके व बक्षिसे का दिली नाहीत!
बी एम. काळे
पुरंदर दि. १८ पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने यशवंतराव चव्हाण कला,क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे दरवर्षी आयोजन करण्यासाठी केंद्र,बीट व तालुका पातळीवर अनुदान दिले जाते.त्यामधून विद्यार्थ्यांना सोईसुविधा,क्रिडासाहित्य,प्रोत्साहनपर बक्षिसे,विजेत्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देवून गौरव समारंभ होणे आवश्यक आहे.मात्र या स्पर्धेबाबत वाळुंजचे केंद्रप्रमुख अनिल जगदाळे यांंनी कमालीची अनास्था दाखवत मनमानी करत आवश्यक प्राथमिक क्रीडा साहित्य व सोईसुविधांपासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवले.उपलब्ध अनुदानाचा योग्य विनियोग केला नाही.
स्पर्धेच्या दिवशी निकाल जाहीर करुन यशस्वी स्पर्धकांना ट्रॉफी,प्रशस्तिपत्रके व बक्षिसे दिली नाहीत.सदर स्पर्धेबात कमालीची अनास्था दाखवली.
सदर दिवशी (5 डिसेंबर )बक्षिस समारंभ आयोजित न केल्यामुळे तक्रारी प्राप्त झाल्यावर जगदाळे यांनी तब्बल दहा दिवसानंतर(14 डिसेंबर रोजी)परवानगी न घेता फक्त प्रथम क्रमांक प्राप्त विजेते स्पर्धकांना वाळुंज येथे बोलावून प्रशस्तिपत्रक व सन्मानचिन्ह वाटले.
अनिल जगदाळे यांचेकडे धालेवाडी केंद्राचा व जेजुरी बीटचा पदभार आहे.धालेवाडी केंद्रांतर्गत क्रीडा स्पर्धेमध्ये तसेच जेजुरी बीटच्या स्पर्धेच्या ठिकाणी देखील विद्यार्थ्यांच्या गैरसोयी झाल्या.त्या ठिकाणी देखील विजेत्यांना प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह व बक्षिसे दिली गेली नाहीत.तेथील अनुदानाचा विनयोग न करता त्या ठिकाणी देखील अपव्यय झाल्याचे समोर आले आहे.
मात्र वाळुंज येथे दहा दिवसानंतर विजेत्या स्पर्धकांना एकत्रित बोलावून ट्रॉफी व प्रमाणपत्राचे वाटप केले.त्याप्रमाणे धालेवाडी व जेजुरी बीटच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान व्हावा अशी पालकांची अपेक्षा होती. मात्र, जगदाळे यांनी दि.16 डिसेंबर रोजी आपल्या अनधिस्त काही शिक्षकांना (शाळा सोडून) या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थ्यांना फक्त साधे प्रमाणपत्र वाटण्यासाठी पाठवून केवळ दिखाऊपणा केला.ते सुध्दा ठराविक शाळेतील शिक्षक यांपर्यंत पोहोचवले. तर अनेक शाळा व यशस्वी विद्यार्थ्यांना वंचित ठेवले.
असाच प्रकार राख केंद्राचे केंद्रप्रमुख व नीरा बीटचे विस्ताराधिकारी यांनी देखील केल्याची चर्चा आहे.
यशस्वी स्पर्धकांना प्रोत्साहित करण्यासाठी ज्या केंद्रप्रमुखांनी व शिक्षण विस्ताराधिकारी यांनी दिरंगाई व कुचराई केली त्यांचेवर कारवाईची अपेक्षा असताना पुरंदरचे गटशिक्षणाधिकारी संजय जाधव हे मात्र संबंधितांना पाठीशी घालण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
अनेक वर्षे केंद्र व बीट पातळीवरील विजेते स्पर्धकांना संबंधितांनी ट्रॉफी व प्रमाणपत्रे दिलेच नसल्याचे समजते.याबाबत देखील पालकांनी चौकशी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.संबंधितांनी तक्रार झाल्यानंतर उशिरा, घाईगडबडीत दहा बारा दिवसानंतर केवळ प्रमाणपत्र देवून बोळवण व फार्स केल्याचे समोर आले आहे.वाळुंज येथे प्रमाणपत्र व ट्रॉफी न दिल्यामुळे पुन्हा कार्यक्रम घेऊन सन्मान केला. त्या प्रमाणे धालेवाडी व जेजुरी बीट मधील यशस्वी स्पर्धकांना एकत्रितपणे सन्मानित का केले नाही ?
तसेच प्रथम क्रमांक मिळालेले स्पर्धकांना ट्रॉफी का दिली नाही ? असा सवाल पालकांनी केला आहे.
गेले अनेक वर्षे स्पर्धेसाठी येणारे अनुदानामध्ये यापूर्वी देखील संबंधितांनी सर्टिफिकेट व ट्रॉफी वाटप कार्यक्रम केला नसल्याचे समजते. तरी सुद्धा दोषींना पाठीशी घालण्यासाठी पुरेपुर काळजी घेणारे गटशिक्षणाधिकारी संजय जाधव यांचेवर देखील पुणे जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी कारवाई करण्याची अपेक्षा पालक व वंचित स्पर्धकांची आहे.