पुणे जिल्ह्यांत राष्ट्रध्वज संहितेचे उल्लंघन ! अवमान प्रकरणी कारवाईची मागणी !!
- पुणे जिल्ह्यांत राष्ट्रध्वज संहितेचे उल्लंघन !
अवमान प्रकरणी कारवाईची मागणी !
- जेजुरी-(बी.एम काळे)’स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव” उपक्रमांतर्गत सर्व प्राथमिक,माध्यमिक विद्यालयांमध्ये १३ व १४ ऑगस्ट दरम्यान “राष्ट्रध्वज संहितेचे”पालन करुन या कालावधीत राष्ट्रध्वज फडकविण्या बाबत केंद्र व राज्य शासनाच्या स्पष्ट सुचना आहेत.
त्यानुसार पुणे जिल्ह्यामध्ये प्राथमिक,माध्यमिक विद्यालयांमध्ये ध्वजवंदन कार्यक्रम एकाच वेळी होणे अपेक्षित असताना देखील वरिष्ठ अधिकारी यांनी पुणे जिल्ह्यामध्ये लेखी आदेश दिले नाहीत.त्यामुळे जिल्ह्यामध्ये बुधवार दि.१३ रोजी ध्वजवंदन कार्यक्रम वेळेमध्ये विसंंगती आढळली.गावातील सार्वजनिक ठीकणी ध्वजारोहण सकाळी ८:३० वा.करण्यात झाले.तर काही प्राथमिक शाळांमधील ध्वजवंदन सकाळी ९:३० वा. झाले.तर अनेक माध्यमिक विद्यालयांतील ध्वजवंदन सकाळी १० ते ११ चे दरम्यान करण्यात आले.
एकाच कुटुंबातील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांत शिकणारे विद्यार्थी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे वेगवेगळ्या वेळी ध्वजारोहणासाठी गेल्यामुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला.
पुणे जिल्ह्यांमध्ये प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांत ध्वजवंदन एकाच वेळी व्हावे.यासाठी अन्य जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी एकत्रितरित्या आदेश दिले तसे ध्वजारोहण वेळेबाबत मुख्याध्यापकांना वरिष्ठांनी लेखी आदेश दिले नाहीत.त्यामुळे प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षक व ग्रामस्थांनी आपापल्या सोईस्कर वेळेनुसार ध्वजारोहण केले.
शिक्षणाधिकारीज्ञयांनी लेखी आदेश न दिल्याने पुरंदरमध्ये स.८:३० वा.तर भोर तालुक्यामध्ये स.१० वा.ध्वजवंदन करण्याबाबत पुरंदर व भोरच्या गटविकास अधिकारी यांनी लेखी आदेश दिले.
तर अन्य तालुक्यात देखील वेळेबाबत एकाच वेळी ध्वजवंदन व शाळा भरवण्याबाबत ताळमेळ नसल्याचे वास्तव समोर आले आहे.
प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पुणे संपूर्ण जिल्ह्यामध्ये गोंधळ निर्माण झाला.
त्यामुळे राष्ट्रध्वजाच्या आदर्श आचारसंहितेचे पालन झाले नाही.राष्ट्रध्वजाचा अवमान झाला. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार,मंत्री दिलीप वळसे,खासदार सुप्रिया सुळे,अमोल कोल्हे,श्रीरंग बारणे यांंनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना जाब विचारावा व संबंधितांवर काराई व्हावी. अशी मागणी विद्यार्थी,पालक,शिक्षणप्रेमी तसेच
राष्ट्राभिमान बाळगणाऱ्या सर्वच देश प्रेमींकडून होत आहे.
याबाबत पुणे जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी संजय नाईकडे यांच्याशी संपर्क साधला असता,”सूर्योदयानंतर सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत ध्वजारोहण करण्याच्या तोंडी सूचना संबंधितांना दिल्या होत्या.”असे सांगितले.
मात्र याबाबत शिक्षणाधिकारी यांच्याकडून तोंडी सूचना देखील प्राप्त झाल्या नसल्याचे पुरंदरमधील अनेक मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांनी सांगितले.