श्रीक्षेत्र जेजुरीगडावर भंडार-खोबऱ्याची आरास
- Ibm news
जेजुरी, दि.३०
श्रीक्षेत्र जेजुरी गडावर कुलस्वामी खंडोबा मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा ही भंडार- खोबरेची पूजा करण्यात आली.
श्री मार्तंड विजय ग्रंथामध्ये श्रींच्या विविध पुजांचे विस्तृतपणे वर्णन केलेले आहे, यामध्ये दवणा पूजा, भंडार पूजा, पुष्प पूजा इत्यादी पुजांचा उल्लेख आहे. त्या आधारावरच कुलस्वामी खंडोबा मंदिरातील गुरव पुजारी, वीर, कोळी, घडशी समाज तसेच देवसंस्थान विश्वस्त मंडळ व सेवेकरी वर्ग यांचे वतीने श्रींच्या विविध पूजा उत्सवाचे आयोजन केले जाते.
वैशाख महिन्यामध्ये श्रींना भंडार – खोबरे ची सजावट आणि आरास केली जाते.
यावर्षी देखील आज खंडेरायासमोर गुरव पुजारी, वीर, कोळी , घडशी समाज व देवसंस्थान विश्वस्त मंडळ व सेवेकरी वर्ग यांच्या वतीने भंडार- खोबरेची आरास करण्यात आली.