जेजुरीदेश विदेशपुणेपुरंदर

साकुर्डे विद्यालयात ए. आय. साक्षरता आणि रोल बॉल प्रशिक्षण सुरु करणार – उदयसिंह जाधव

साकुर्डे विद्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा

सौ हेमांगीनी काळे यांचा सन्मान

प्रतिनिधी
जेजुरी, दि. १७ आजच्या स्पर्धेच्या युगात खेळ आणि तंत्र शिक्षण ही संस्कृती रुजवणे काळाची गरज निर्माण झाली आहे. यासाठी विद्यालयात ए. आय.( कृत्रिम बुद्धिमत्ता)आणि रोल बॉल प्रशिक्षण सुरु करण्याचा प्रयत्न असल्याचे संस्थेचे अध्यक्ष उदयसिंह जाधव यांनी म्हटले आहे.
साकुर्डे( ता. पुरंदर) येथील मातोश्री जिजाऊ सोपान जाधव विद्यालयात भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
ध्रुव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा उदयसिंह जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन सादर करून ध्वजाला मानवंदना दिली. यावेळी पुणे येथील सिमुसॉफ्ट कंपनीचे संस्थापक सुनील चौरे प्रमुख अतिथीम्हणून उपस्थित होते. याच कार्यक्रमात साकुर्डे गावच्या स्नुषा व महेश विद्यालय,पुणे येथील सहशिक्षिका सौ हेमांगीनी प्रमोद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच केनिया (नेरोबी) येथे झालेल्या १७ वर्षाखालील रोलबॉल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळाल्याबद्दल त्यांचा साकुर्डे ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना सौ हेमांगीनी काळे यांनी विद्यालयात रोलबॉल खेळामध्ये विद्यार्थी तयार करण्याची तयारी दर्शवली. तर
पुणे येथील सिमुसॉफ्ट कंपनीच्या वतीने विद्यालयामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता याचे प्रशिक्षण चालू करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमामध्ये एस एस सी परीक्षा मार्च २०२५ मध्ये यशस्वी विद्ययार्थ्यांचा ग्रामस्थांच्या वतीने रोख बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून साकुर्डे गावचे सरपंच मा राजेंद्र जाधव,उपसरपंच सौ लीलाताई गायकवाड, सुरेश सस्ते,सुरेश जाधव, किसनराव देशमुख, प्रकाश जाधव,अमित सस्ते, माजी सरपंच रामचंद्र जाधव, राजेंद्र सस्ते, मुख्याध्यापक मा गणेश कामथे ,साकुर्डे ग्रामस्थ व विद्यालयाचे शिक्षक उपस्थित होते.
सूत्रसंचालन पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीचे सचिव तानाजी झेंडे व रवींद्र शिंदे यांनी तर आभार बी. एम. काळे यांनी मानले. ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page