राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य संघटक व सचिव पदी जेजुरीच्या अमृता घोणे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य संघटक व सचिव पदी जेजुरीच्या अमृता घोणे
जेजुरी. दि. 23 जेजुरी नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा आणि श्री खंडोबा देवस्थानच्या मा. विश्वस्त सौ. अमृता संदीप घोणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राज्य कार्यकारणी मध्ये (अजित पवार गट) राज्य संघटक, सचिव पदी निवड करण्यात आली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दि.२२ रोजी पक्ष कार्यालय मुंबई येथे नियुक्ती पत्रक देण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ,महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी खासदार पंकज भुजबळ साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.