वारी साक्षरतेची” साक्षरतेची वारी, पंढरीच्या दारी..

(प्रतिनिधी)

पुणे, दि. २३ केंद्रपुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत शिक्षण संचालनालय (योजना) कार्यालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्फत दरवर्षी साक्षरता वारीचे आयोजन केले जाते. सदर “वारी साक्षरतेची” उपक्रमांतर्गत देहू ते पंढरपूर या संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पालखी मार्ग व आळंदी ते पंढरपूर या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग दोन्ही पालखी मार्गावर प्रत्येकी एक साक्षरता रथ प्रचार प्रसार करीत आहे. सदर साक्षरता रथाच्या माध्यमातून दोन्ही पालखी मार्गावरील असाक्षर वारकऱ्यांमध्ये शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी पपेट शो, बाहुली नाट्य, पथनाट्य, साक्षरता घोषणा, साक्षरता गीते, साक्षरता घडीपत्रके, उल्लास उपरणे, उल्लास टोप्या वाटप, उल्लास छत्री वाटप, असाक्षरांची ऑनलाइन व ऑफलाईन नोंदणी इ. उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. साक्षरता रथासोबत असलेले स्वयंसेवक शिक्षक यांनी वारकऱ्यांसोबत पायी चालत दिवेघाटामध्ये असाक्षर वारकऱ्यांचे प्रबोधन केले.
सदर वारीचा शुभारंभ सचिंद्र प्रताप सिंह,शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य,पुणे यांच्या शुभहस्ते व राहुल रेखावार,संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे व डॉ. महेश पालकर संचालक, शिक्षण संचालनालय योजना महाराष्ट्र राज्य पुणे, कृष्णकुमार पाटील संचालक, बालभारती पुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत अलका चौक, पुणे या ठिकाणी करण्यात आला होता.
याप्रसंगी भाऊसाहेब सरक, शिक्षण विस्तार अधिकारी शिक्षण शिक्षण संचालनालय योजना म्हणाले, ” वारी साक्षरतेची हा उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत मा. डॉ. महेश पालकर शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय (योजना) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला एक महत्त्वकांक्षी उपक्रम असून यावर्षी साक्षरतेच्या वारीला वारकऱ्यांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत आहे. असाक्षरांच्या नोंदणीचे उद्दिष्ट आम्ही 100% साध्य करणार आहोत.” सदर वारी साक्षरतेची प्रचार प्रसार करण्याचे कामकाज स्वयंसेवक नागसेन साबळे, हुमायू मोरे, करुणा साबळे, उन्नती साबळे, दीपक भुजबळ ,भारती भगत , अनंता पोकळे, सोनाली चव्हाण, दिपक बडगुजर, सस्ते ज्ञानदेव हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page