शिक्षकांच्या अभावी विद्यार्थ्यांचे नुकसान. पोर्टलद्वारे शंभर टक्के शिक्षकांची भरती करावी
– प्राचार्य नंदकुमार सागर
जेजुरी, दि. २४ शाळेतील शिक्षक सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या रिक्तजागी भरती होत नसल्याने संस्था शाळा ,समाज व विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते. शासनाने पोर्टल द्वारे शंभर टक्के शिक्षकांची भरती करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे सचिव प्राचार्य नंदकुमार सागर यांनी केली.
श्री मल्हार शिक्षण मंडळ कोथळे संचलित विद्या महामंडळ प्रशाला येथे शिक्षक सुग्रीव चव्हाण यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्राचार्य नंदकुमार सागर बोलत होते. ते पुढे म्हणाले . सध्या २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील पोर्टल द्वारे केवळ ८०टक्के भरती प्रक्रिया सुरू आहे. दरवर्षी अनेक शिक्षक सेवानिवृत्त होतात. शाळेत शिकवण्यासाठी शिक्षक उपलब्ध होत नाहीत. इतर शिक्षकांवर ताण निर्माण होवून त्याच विषयाचे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते. शासनाने पोर्टल द्वारे शंभर टक्के शिक्षकांची भरती करावी.
यावेळी सेवापूर्ती निमित्त शैक्षणीक संस्था,संघटना,शिक्षक व विद्यार्थ्यांच्या वतीने सुग्रीव चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला.
या वेळी श्री मल्हार शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा चंद्रलेखा जगताप,पदाधिकारी ज्ञानेश्वर भोईटे गुरुजी,शंकर जगताप,पी एम जगताप,शामराव जगताप,ज्ञानेश्वर जगताप,सुरेश खैरे , रवींद्र जगताप,सरपंच जयश्री भोईटे,वंदना जगताप, प्राचार्य विक्रम कांबळे,प्राचार्य सुंदरदास चव्हाण ,मुख्याध्यापक प्रशांत कदम ,आजी माजी मुख्याध्यापक व ग्रामस्थ उपस्थित होते