जेनट्रॅकची ग्लोबल लिडरशिप च्या प्रमुखांची साकुर्डे येथील जलसंधारण प्रकल्पास भेट

नाम फौंडेशन चा उपक्रम

जेजुरी, दि. २४ पुरंदर तालुक्यातील दुष्काळग्रस्त साकुर्डे येथे ग्रामस्थांनी नाम फाउंडेशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्या मदतीने सुरू केलेल्या गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या प्रकल्पास जेनट्रॅक ग्लोबल लीडरशिप या जागतिक संस्थेच्या टीम ने नुकतीच भेट दिली. झालेली कामे आणि सुरु असणारी जलसंधारणाच्या कामांची पाहणी केल्यानंतर या प्रकल्पाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासने ही त्यांनी दिले.

साकुर्डे येथे नाम फाउंडेशन व टाटा मोटर्स यांच्या सीएसआर फंडातून गावातील ओढे आणि तलाव यांचे खोलीकरण आणि रुंदीकरणाचे मोठ्या प्रमाणात काम करून घेण्यात येत आहे. भविष्यकाळात नाम फाउंडेशनच्या मदतीमुळे साकुर्डे गावची दुष्काळी गाव म्हणून असलेली ओळख ही जलयुक्त साकुर्डे गाव अशी निर्माण होईल. एवढे मोठे काम करण्याचा ग्रामस्थांचा प्रयत्न आहे.
नाम फाउंडेशन आणि महाराष्ट्र सरकारचे या योजनेअंतर्गत सुरू असलेले हे काम पाहण्यासाठी गावचे समन्वयक अमित सस्ते यांच्या पुढाकाराने जेनट्रॅक ग्लोबल या जागतिक स्तरावर काम करणाऱ्या कंपनीचे सीईओ गॅरी माइल्स आणि इतर सर्व ग्लोबल लीडर्स , तसेच जेनट्रॅक कंपनीची इंडिया टास्क फोर्स असे मिळून २१ जणांची टीम दाखल झाली होती. परदेशी पाहुण्यांचे स्वागत साकुर्डे हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनीनी सडा रांगोळ्या आणि हलगी व लेझीमच्या तालात करण्यात आले.
यानंतर परदेशी पाहुण्यांनी साकुर्डे गावात जलसंधारणाच्या निमित्ताने झालेल्या कामाची पाहणी केली. होत असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त करताना नाम फाउंडेशन आणि गावकऱ्यांचे कौतुक केले. भविष्यात गावच्या सर्वांगीन विकासासाठी सहकार्य करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. यावेळी नाम फाउंडेशनचे सीईओ गणेश थोरात, पदाधिकारी निलेश जावळकर, गणेश गायकवाड, जेनट्रॅक ग्लोबलचे चीफ फायनान्स ऑफिसर जॉन प्रिजेन, समन्वयक झीव बेरकोवित्झ, फ्रॅन्सिस कॅल्डवेल, माईक कॅरुथेरस, गेऑफ़ चिल्ड्स, मार्क हुंफेरेस, सॅम्पसन लॉरेल, ब्रँडेली स्कॉट, स्टीवर्ट ग्रीन, साकुर्डे गावचे सरपंच श्री राजेंद्र जाधव, माजी सरपंच निलेश जगताप, राजेंद्र सस्ते, अजित जाधव सोसायटीचे चेअरमन मोहन जाधव, पोपट सस्ते, ग्रामपंचायत पदाधिकारी, भैरवनाथ तरुण मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. मान्यवरांना गावची ओळख व आतापर्यंत झालेल्या कामाची माहिती शेतकरी शास्रज्ञ मंच चे अध्यक्ष सुरेश सस्ते यांनी दिली. तर सुत्रसंचलन पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीचे सचिव तानाजी झेंडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page