स्नेहांकुर” संस्थेच्या वतीने पुरंदर तालुक्यातील शाळांना मदतीचा हात
“स्नेहांकुर” संस्थेच्या वतीने पुरंदर तालुक्यातील शाळांना मदतीचा हात
जेजुरी, दि. २३(प्रतिनिधी)
” स्नेहांकुर” द रे ऑफ होप या संस्थेच्या वतीने पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी तसेच नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांची अध्ययन पातळी वाढावी आणि शाळा गुणवतापूर्ण व्हाव्यात या हेतूने अनेक शाळांना सातत्याने अनेक वर्षे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येत आहे.
संस्थेच्या वतीने तालुक्यातील भैरवनाथ विद्यालय वनपुरी,मांढर माध्यमिक विद्यालय मांढर व जिजामात प्राथमिक विद्यालय विभाग जेजुरी या शाळांना ई-लर्निंग सेट तसेच प्राथमिक शाळा गुरोळी,न्यू इंग्लिश स्कुल जेऊर आणि माध्यमिक विद्यालय यादववाडी या शाळांना सी.सी.टी व्ही कॅमेरा संच तर रिसे-पिसे माध्यमिक विद्यालय रिसे याना प्रिंटर देण्यात आला.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य सचिव, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर, पुणे जिल्हा शिक्षका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामप्रभू पेटकर व पुरंदर तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष दत्तात्रय रोकडे यांनी स्नेहांकुर संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा ऍड वृषाली दातार व त्यांची टीम यांचे धन्यवाद मानून आभार व्यक्त करताना भविष्यात सुद्धा पुरंदर मधील माध्यमिक शाळांना सहकार्य करण्याबद्दल अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी संस्थापक अध्यक्षा वृषाली दातार,जयप्रकाश दातार,अभिजित दातार,राम फडके,पूर्वा गदो,कस्तुरी मराठे,सिद्धी फडके तसेच वनपुरीच्या मुख्याध्यापिका लता बोकड त्यांचा सर्व शिक्षक स्टाफ,विद्यार्थी उपस्थित होते.