स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी केंद्र शाळेचा वापर !
प्रभारी केंद्र प्रमुख प्रताप मेमाणेंची चौकशी होणार.
जेजुरी, दि. २३ ( प्रतिनिधी,) शासकीय कार्यालये अथवा इमारतीमध्ये शालेय कामकाजाच्या वेळेव्यतिरिक्त कार्यक्रमांचे आयोजन करताना वरिष्ठांची परवानगी घेणे आवश्यक असते.मात्र चांबळी (ता.पुरंदर) येथील केंद्र शाळेत प्रभारी केंद्रप्रमुख प्रताप मेमाणे यांनी मनमानी व अधिकाराचा गैरवापर करत वरिष्ठांची कोणतीही परवानगी न घेता व शालेय वेळेच्या वेळे नंतर एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. वास्तविक रित्या अशा स्वरुपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याने मेमाणे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
तसेच प्रताप मेमाणे यांच्याकडे दिवे केंद्राचा अधिकृत केंद्रप्रमुख पदाचा पदभार असताना देखील तेथे मात्र अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केले नाही.मात्र चांबळी केंद्राचा अतिरिक्त पदभार असताना या ठिकाणी अशा कार्यक्रमाचे आयोजन केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
या संदर्भात पुरंदर तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पंकज शेळके,पंचायत समिती शिक्षण विभागाचे अधिक्षक अनिल मोरे यांच्याशी संपर्क साधला असता,”आम्हाला याबाबत केंद्र प्रमुख प्रताप मेमाणे यांनी सदर कार्यक्रमाबाबत कसलीही कल्पना दिलेली नव्हती. आणि काय कार्यक्रम झाला ! हे देखील आम्हाला माहिती नाही. आमच्या कार्यालयाकडून कार्यक्रमासाठी परवानगी घेतली नव्हती.”
याबाबत पुणे जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांच्याशी संपर्क साधला असता,”पुणे जिल्ह्यात मेमाणे यांच्या सारखे काही अतिउत्साही केंद्रप्रमुख वारंवार त्यांच्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करत स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी शालेय कामकाजाच्या वेळे व्यतिरिक्त वरिष्ठांना कल्पना न देता अथवा परवानगी न घेता केंद्र शाळेत कार्यक्रमांचे आयोजन करतात.त्यासाठी चांबळी केंद्र शाळेचा वापर केल्याचे समजत आहे.याबाबत संबंधितांना खुलासा मागविण्यात येणार असल्याचे सांगितले.
या संदर्भात केंद्रप्रमुख प्रताप मेमाणे यांच्याशी संपर्क साधला असता,”सदर कार्यक्रमाचे आयोजन मी केलेले नव्हते. मात्र चांबळी केंद्रातील शिक्षकांनी मला सदर कार्यक्रमाला या.असा आग्रह केल्याने मी सदर कार्यक्रमासाठी उपस्थित होतो.”असे सांगितले.
चांबळी केंद्रातील शिक्षकांव्यतिरिक्त माहूर केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र कुंजीर, पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष गणेश लवांडे हे त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित कसे होते ? तसेच मेमाणे यांच्या अडचणीत वाढ व्हावी. म्हणून जाणिवपूर्वक मेमाणे यांना आग्रहाने बोलवणारे शिक्षक कोण ?
अशी चर्चा पुरंदरच्या शैक्षणिक क्षेत्रात आहे.