चांबळी केंद्र शाळेत मटण पार्टी? चौकशी व्हावी
केंद्रप्रमुख प्रताप मेमाणे यांची चौकशी व्हावी
जेजुरी, दि. २७ जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा -चांबळी (ता.पुरंदर) येथे शनिवार दि.८ मार्च २०२५ रोजी सकाळची शाळा सुटल्यावर दुपारी शाळेची वेळ नसताना तसेच वरिष्ठांची कोणतीही परवानगी न घेता प्रभारी केंद्र प्रमुख प्रताप मेमाणे व आयोजकांनी येथील शिक्षक मोहन जगताप यांची पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेमध्ये संचालकपदी निवड झाल्याने चांबळी केंद्रातील तसेच तालुक्यातील ठराविक शिक्षक व अधिकाऱ्यांना एकत्रितपणे बोलावत ज्ञानदानाचे पवित्र कार्य होत असलेल्या ज्ञान मंदिरात शनिवार असताना देखील चक्क मटण-पार्टीची मेजवानी दिली.
वास्तविक रित्या शाळेमध्ये शालेय कामकाजाच्या वेळेव्यतिरिक्त कार्यक्रमांचे आयोजन करताना वरिष्ठांची परवानगी घेणे आवश्यक असते.मात्र चांबळी केंद्र शाळेत प्रभारी केंद्रप्रमुख प्रताप मेमाणे व आयोजक शिक्षकांनी मनमानी वकरीत अधिकाराचा व पदाचा गैरवापर करत वरिष्ठांची तसेच शाळा व्यवस्थापन समितीची व ग्रामस्थांची कोणतीही परवानगी न घेता व शाळेची वेळ नसताना देखील या कार्यक्रमाचे आयोजन का केले होते.? याचे गौडबंगाल समजत नाही.
ऐतिहासिक,आध्यात्मिक व शैक्षणिक वारसा ,परंपराअसणाऱ्या व जपणाऱ्या चांबळी गावातच ग्रामस्थांना बाजूला ठेवून ज्ञानदाना सारख्या पवित्र क्षेत्रात काम करणाऱ्या नास्तिक शिक्षकांनी शनिवार असताना देखील मांसाहारी मटण पार्टी केल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या पार्टीची मोठीं चर्चा ही होतं आहे.
जिल्हा परिषदे मार्फत संबंधित विषयाची सखोल चौकशी होवून दोषींवर निलंबनाची कारवाई व्हावी.अशी मागणी होत आहे.