चांबळी केंद्रशाळा मटण पार्टी ची चौकशी होणार?
मांसाहारी जेवणावर ताव मारणाऱ्या गुरुजींना नैतिकतेचा देखील विसर…!
गुरुजींच्या खोटारडेपणामुळे,’चोराच्या उलट्या बोंबा..’बुडत्याचा पाय आणखी खोलात..’ या म्हणींचा प्रत्यय !
जेजुरी, दि.५ ( प्रतिनिधी ) जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा-चांबळी (ता. पुरंदर) येथे शनिवार दि.८ मार्च २०२५ रोजी वरिष्ठांची कोणतीही परवानगी न घेता प्रभारी केंद्र प्रमुख प्रताप मेमाणे व आयोजकांनी शिक्षक पतसंस्थेच्या संचालकपदी चांबळी प्राथमिक शाळेतील शिक्षक मोहन जगताप यांची निवड झाल्याने शिक्षकांना चक्क मांसाहारी जेवण दिले होते.
ज्ञानदानाचे पवित्र कार्य होत असलेल्या ज्ञान मंदिरात शनिवार असताना देखील सदर घटना घडल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ तसेच उलटसुलट चर्चा होती.
ऐतिहासिक,आध्यात्मिक व शैक्षणिक वारसा,परंपरा जपणाऱ्या चांबळी गावातच ग्रामस्थांना व विद्यार्थ्यांना बाजूला ठेवून फक्त ठराविक शिक्षकांनाच मांसाहारी जेवण दिल्याने या गंभीर घटनेची सखोल चौकशी होवून दोषींवर निलंबनाची कारवाई व्हावी.अशी अपेक्षा IBM महाराष्ट्र news ने २७ मार्च रोजीच्या वृतातून केली होती.या वृत्ताची दखल घेत मांसाहारी जेवण देणाऱ्यांची सखोल चौकशी होवून कारवाई होणार असल्याचे खात्रीलायक समजते.
याबाबतची खबर लागताचं आयोजकांचे व आयोजकांच्यावर दबाव आणून विना परवानगी कार्यक्रम घ्यायला लावणाऱ्यांचे धाबे दणाणले असून आपली बदनामी होऊन कारवाई होणार या भीतीने
मांसाहारी जेवण दिलेच नाही. म्हणून उपस्थित शिक्षकांकडू लेखी घेण्यासाठी जोरदार पळापळ व मनधरणी सुरु आहे.शाळेमध्ये चक्क मांसाहारी जेवणावर ताव मारणारे गुरुजी देखील यांच्या दबावामुळे व विरोध टाळण्यासाठी मांसाहार केला नसल्याबद्दल लेखी देत आहेत.
अशा प्रकारे विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना खोटे बोलू नये असे शाळेत धडे देणाऱ्या गुरुंकडूनच सत्य लपविण्यासाठी सुरु असलेल्या सारीपाटामुळे विद्यार्थ्यांनी व समाजाने नक्की कोणता आदर्श घ्यायचा!
यामध्ये उपस्थित शिक्षकांकडून खोटे लिहून घेण्यात अग्रेसर असणाऱ्या मोहन जगताप यांचेशी संपर्क साधला असता,”छे ! मी कोणत्याही शिक्षकांकडे अशा पद्धतीने सह्या घेण्यासाठी भेटलो नाही.”असा कांगावा करत साळसूद पणाचा आव आणला.
मात्र,”मोहन जगताप हे सह्या घेण्यासाठी फिरत होते. तसेच आमच्याकडे देखील आले होते.” असे अनेक शिक्षकांनी नांव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
शाळेत शिक्षकांना मांसाहारी जेवण दिलेचं नसल्याचे खोटे कागदोपत्री पुरावे सादर करुन आयोजक नक्की काय साध्य करणार आहेत. कारण मांसाहारी जेवण दिल्याचे खुद्द मुख्याध्यापक शोभा कामठे व मोहन जगताप यांनीच कबूल केले आहे.
त्यामुळे बुडत्याचा पाय खोलात,तसेच चोराच्या उलट्या बोंबा !’
या म्हणींचा प्रत्यय म्हणजेचं मोहन जगताप यांनी दिलेली प्रतिक्रिया असे खेदाने म्हणावेसे वाटते.
तसेच येथील प्रभारी केंद्रप्रमुख प्रताप मेमाणे यांच्या कडून खोटे कागदपत्रे तयार करण्यासाठी दबाव असल्याचे सह्या गोळा करण्यासाठी फिरणारांकडून शिक्षकांना सांगितले गेले आहे.
याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यामुळे शिक्षण क्षेत्रात अशा प्रकारे अशोभनीय प्रकार करणाऱ्यांची वरिष्ठांनी दखल घेवून निःपक्षपाती व पारदर्शकपणे चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमल्याचे खात्रीलायक वृत्त समजत आहे.
त्यामुळे केंद्र प्रमुख प्रताप मेमाणे व संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल मांसाहारी जेवण देणारे मोहन जगताप यांच्या अडचणींत वाढ होवून त्यांचा खोटारडेपणा समोर येणार त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई होणार ! हे मात्र नक्की.