किर्लोस्कर फेरस कंपनीकडून भूमिपुत्रावर अन्याय, कंपनी एच आर वर गुन्हा दाखल
जेजुरी, प्रतिनिध
दि. १९ जेजुरी औद्योगिक क्षेत्रालगत कोळविहिरे गावचे हद्दीतील घाटेवाडी नजीक असणाऱ्या किर्लोस्कर फेरस कंपनीच्या एच आर जब्बार पठाण आणि सागर झोपे आणि कामगार कंत्राटदार राहुल नाझीरकर यांच्या विरोधात जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून ही तक्रार कंपनीच्या कंत्राटी कामगार मयूर मोटे यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत जेजुरी पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी मयूर पोटे हा किर्लोस्कर फेरस कंपनीत कंत्राटदार राहुल नाझीरकर यांच्याकडे गेल्या सहा महिन्यापासून कामाला आहे. दरम्यान कंपनीच्या प्रदूषनाविरोधात फिर्यादीचा भाऊ आणि इतर शेतकरी न्यायलयीन लढाई लढत आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडे ही याबाबत तक्रारी दाखल आहेत. या तक्रारी मागे घ्याव्यात म्हणून किर्लोस्कर कंपनीच्या एच आर विभागाकडून फिर्यादीवर दडपन आणले जात आहे. दरम्यान,गेल्या १३ डिसेंबर रोजी फिर्यादी मयूर मोटे याला आरोपी जब्बार पठाण, सागर झोपे आणि राहुल नाझीरकर यांनी कंपनी कार्यालयात बोलावून घेतले. तुझ्या भावाने कंपनी विरोधात केलेल्या केसेस काढून घे. किंवा तू कंपनीच्या लोकांना शिवीगाळ केलेली आहेस असा माफीनामा लिहून दे असा दबाव आणला. नाहीतर तुला कंपनीतून काढून टाकले जाईल. फिर्यादीने या केसेस आणि माफीनामा बाबत माझा काहीही संबंध नसताना मी माफीनामा का लिहून देऊ असे म्हणत नकार दिला असता आरोपीनी त्याला शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. जेजुरी पोलिसांनी भा. द. वि.कलम ३५२, ३५१(२), (३) ३(५) फिर्याद दाखल करून घेतली आहे. पुढील तपास जेजुरी पोलीस ठाण्याचे सपोनि दीपक वाकचौरे हे स्वतः करीत आहेत.




