जेजुरीपुणेपुरंदरसामाजिक

आद्य क्रांतिवीर उमाजी राजे नाईक यांना जेजुरी गडावर अभिवादन.

रवींद्र खोमणे
जेजुरी, दि. ८ आद्य क्रांतिवीर उमाजी राजे नाईक युथ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने श्रीक्षेत्र जेजुरी गडावर उमाजी राजे नाईक यांच्या २३५ वी जयंती निमित्त अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जेजुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष जयदीप बारभाई यांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मान्यवरांच्या व शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थिती उमाजी राजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करुन मानवंदना देण्यात आली. रामोशी समाजाला जेजुरी येथे स्वतंत्र सांस्कृतिक भवन उभारणार असल्याचे नगराध्यक्ष श्री बारभाई यांनी यावेळी सांगितले.
श्री मार्तंड देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त अँड विश्वास पानसे यांनी उमाजी राजेंच्या इंग्रजा विरुद्ध लढ्याबद्दल इतिहास कथन करतानाच उमाजी नाईकांच्या पुतळा परिसर सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात केली असल्याचे ही सांगितले. यासाठी देव संस्थान कडून यांनी अकरा लाख रुपये खर्च करून सुशोभीकरण लवकरच पूर्ण करू. खंडोबा मंदिरात तटबंदीमध्ये असणारी उमाजी राजे नाईक यांची तालीम हे सुद्धा लवकर पूर्ण केली जाईल असे आश्वासन यावेळी दिले.
मार्तंड देव संस्थानचे विश्वस्त व रामोशी समाजाचे अभ्यासक पोपटराव खोमणे, मंगेश घोणे,जेजुरी नगरपालिकेच्या नगरसेविका मोनिका घाडगे यांनी ही आपली मनोगत व्यक्त केली.
कार्यक्रमाला मार्तंड देव संस्थानचे विश्वस्त अँड पांडुरंग थोरवे, नगरसेविका प्रज्ञा राऊत, मंदा बयास, नगरसेवक रमेश लेंडे, अभिजीत कुदळे, कृष्णा कुदळे, रोहित खोमणे, कामगार नेते सुरेश दादा उबाळे, सचिन शिंदे दादा फाउंडेशनचे अध्यक्ष यशवंत दोडके, माजी उपनगराध्यक्ष रमेश बयास उमाजी नाईक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अनंता बापू चव्हाण, जिजामाता हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्युनिअर कॉलेज, दादा जाधवराव विद्यालय जुनी जेजुरी या विद्यालयातील ५००विद्यार्थी व शिक्षक, अध्यक्रांतिवीर उमाजी राजे नाईक फौंडेशन चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होतेव.
प्रास्ताविक रविंद्र खोमणे यांनी केले. तर आभार सागर खोमणे यांनी मानले.
युथ फाउंडेशनचे उपाध्यक्ष माऊली खोमणे, सचिव शिवाजी चव्हाण अशोक खोमणे मोहन खोमणे राजेंद्र खोमणे मनोज आडके शांताराम खोमणे बापू खोमणे गणेश चव्हाण सोमनाथ मदने बाप्पू खोमणे अमोल खोमणे मल्हारी चव्हाण, आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page