भारत ८ व्यांदा चॅम्पियन! भारताने श्रीलंकेला ७२ धावांनी हरवून जिंकला एशिया कप
प्रतिनिधी
पुरंदर, दि. १४
१३ सप्टेंबरला झालेल्या महिला T20 एशिया कप २०२६ च्या फायनलमध्ये टीम इंडियाने डिफेंडिंग चॅम्पियन श्रीलंकेला एकतर्फी ७२ धावांनी धूळ चारली. यासोबतच भारताने ८व्यांदा एशिया कपचं विजेतेपद पटकावलं आणि २०२४ च्या फायनलमधील पराभवाचाही बदला घेतला.
शेफाली-मांधनाची वादळी सुरुवात – शतकी भागीदारी
हरमनप्रीतने नाणेफेक जिंकून आधी बॅटिंगचा निर्णय घेतला. आणि मग जे झालं ते धमाकेदार होतं. शेफाली वर्मा आणि स्मृती मांधनाने पहिल्या विकेटसाठी १०० पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली.
शेफालीने फक्त २४ बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं – महिला एशिया कप फायनलमधील सर्वात जलद ५०. तिने ३९ बॉलमध्ये ९ चौकार आणि २ षटकारांसह ६८ धावा केल्या.
स्मृतीनेही फॉर्ममध्ये पुनरागमन करत ३५ बॉलमध्ये ५९ धावांची खेळी केली. दोघींनी मिळून टीमला १३व्या ओव्हरपर्यंत १२९ धावांपर्यंत पोहोचवलं.
मिडल ऑर्डर कोलमडला, तरीही १८३ चा डोंगर
शेफाली बाद झाल्यानंतर धावगती थोडी मंदावली. मांधनाही धावबाद झाली. ऋचा घोष १७, हरमनप्रीत १४, आणि दीप्ती शर्मा फक्त ५ धावा करून बाद झाल्या.
पण या स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणाऱ्या जी कमलिनीने १५ धावांची महत्त्वाची खेळी केली आणि भारताला १८३? ७ पर्यंत नेलं.
स्पिनर्सचा जलवा – १० पैकी ९ विकेट स्पिनर्सच्या नावावर
१८३ धावांच्या टार्गेटसमोर श्रीलंकेची बॅटिंग पूर्णपणे फेल झाली. ओपनर इमेशा दुलानी तर पहिल्याच ओव्हरमध्ये ४ धावांवर बाद झाली.
चामरी अटापट्टू ३७ आणि विश्मी गुणारत्ने २० यांनी ५८ धावांची भागीदारी केली, पण दीप्ती शर्माने ४ बॉलच्या आत दोघींनाही बाद करून मॅच संपवली. दीप्तीने ३ विकेट घेतले.
श्री चरणी सर्वात यशस्वी ठरली – तिने ४ विकेट घेतले. एकूणच भारतीय स्पिनर्सनी १० पैकी ९ विकेट घेतले. श्रीलंका १११ धावांवर ऑलआउट झाली.
भारताचं वर्चस्व कायम
या विजयासोबत भारताने अजिंक्य राहत विजेतेपद पटकावलं. आतापर्यंत महिला एशिया कप १० वेळा झाला आहे आणि भारताने ८ वेळा ट्रॉफी जिंकली आहे. फक्त २०१८मध्ये बांगलादेश आणि २०२४ मध्ये श्रीलंकेकडूनच भारत फायनल हरला होता.
एशियन गेम्स २०२६ आधी या विजेतेपदाने सिद्ध केलंय की गोल्ड मेडलसाठी टीम इंडिया सगळ्यात मजबूत दावेदार आहे.




