जेजुरी गडावर पौष पौर्णिमेनिमित्त शांकभरी उत्सव

 खंडोबा देवाला पालेभाज्यांची आरास
प्रतिनिधी
जेजुरी, दि. ३ महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरी गडावरील खंडोबा मंदिरात शांकभरी उत्सवानिमित्त फळभाज्या व पालेभाज्यांची आरास करण्यात आली.

पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी पासून पौष पौर्णिमेपर्यंत शाकंभरी उत्सव साजरा केला जातो. शनिवार दिनांक ३ रोजी पहाटेच्या पुजे वेळी पुजारी सेवक वर्गाच्या वतीने ही सजावट करण्यात आली.

पौराणिक कथेनुसार जेव्हा पृथ्वीवर प्रलय आला होता सर्वत्र अन्नधान्याची टंचाई होती तेव्हा त्रैलोकातील दुःख पाहून ऋषींनी मातेची प्रार्थना केली. मग शाकांबरी देवीने भाजी आणि वृक्षवेलींच्या रूपाने विश्वाचे पालन पोषण केले आणि विश्वाचा नाश होण्यापासून वाचवले. त्यामुळे शाकंभरी उत्सवाच्या काळात हिरव्या पालेभाज्या फळभाज्या आणि शेंगवर्गीय भाज्यांची पूजा केली जाते आणि त्याचा प्रसाद भाविकांमध्ये वाटला जातो.

या उत्सवासाठी ३०० किलो पालेभाज्या, फळभाज्या व शेंगवर्गीय भाज्या वापरण्यात आल्या.
ही आरास आरास नित्य वारकरी, पुजारी वर्ग, कर्मचारी सेवकरी वर्ग यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page