समृद्धी ऑरगॅनिक कडून साकुर्डे येथे मोफत मुरघास वाटप
साकुर्डे
दि.३० समृद्धी ऑरगॅनिक फार्म इंडिया प्रा. लि. कंपनीतर्फे दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांच्या गायीसाठी मोफत मुरघास वाटप करण्यात आले. कंपनीने सुमारे अडीच टन मुरघास शेतकऱ्यांना मोफत दिला.
पुरंदर तालुक्यातील शेतकरी दुष्काळाची चटके सोसत आहे. पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी चारा या दोन समस्या गंभीर बनलेल्या आहेत. या बिकट प्रसंगी अनेक संघटना, संस्था आपापल्या परीने शेतकऱ्यांना मदतीचा हात देत आहेत.
शेतकऱ्यांना सेंद्रिय गटामार्फत मार्गदर्शन करणारी समृद्धी ऑरगॅनिक फार्म इंडिया प्रा. लि. ही कंपनी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत मोराणकर त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप, शेती उपयोगी अवजारे, सेंद्रिय निविष्ठा, परराज्यात अभ्यास दौरे, सेंद्रिय शेतमाल खरेदीसाठी विभागनिहाय शेतकरी सुविधा केंद्र आदी उपक्रमाद्वारे सहकार्य केले जात आहे. साकुर्डे येथील गोमाता सेंद्रिय शेती गटाचे अध्यक्ष सुरेश सस्ते यांनी कंपनीकडे येथील शेतकऱ्यांची व्यथा मांडली
कंपनीने हे प्रतिसाद देत ६५ किलोच्या ४० मुरघास च्या बॅगा साकुर्डे येथे आणून शेतकऱ्यांना वाटप केले.
सेंद्रिय शेतीत पशुधनाचे अनन्य साधारण महत्त्व असून गाय वाचली तर सेंद्रिय शेती टिकू शकते. गोमातेची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली. अशी भावना यावेळी व्यवस्थापकीय संचालक प्रशांत मोराणकर यांनी व्यक्त केली