जेजुरीत पालखी मैदानाची आळंदी देवसंस्थान कडून पाहणी.
जेजुरी, दि.९ महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीत दरवर्षी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचां एक दिवस मुक्काम असतो. या सोहळ्यात वारकरी बांधवांना सोयी सुविधा उपलब्ध व्हावेत यासाठी आळंदी देवसंस्थान कमिटीच्या वतीने जेजुरी येथील पालखी तळाची पाहणी करण्यात आली.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी जेजुरी गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या ऐतिहासिक होळकर तलावाकाठी सुमारे नऊ एकर जागेत पालखी तळ विकसित करण्यात आला आहे.
या सोहळ्यातील वारकरी बांधवांना सोयी सुविधा उपलब्ध व्हावेत या साठी आळंदी देवसंस्थान कमिटीच्या वतीने आज जेजुरी येथील पालखी तळाची पाहणी करण्यात आली.
यावेळी आळंदी देवसंस्थान कमिटीचे प्रमुख योगी निरंजन नाथ,विश्वस्त भावार्थ देखणे, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर,बाळासाहेब चोपदार,रामभाऊ चोपदार, तहसीलदार विक्रम राजपूत ,नायब तहसीलदार सोनाली वाघ, जेजुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले, सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे,तसेच सार्वजनिक बांधकाम व इतर विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी कमिटीच्या वतीने सोयी सुविधा बाबत प्रशासनाला सूचना करण्यात आल्या.तसेच या पालखी तळावर पालखी विसावण्यासाठी ओट्याची जागा निश्चित करण्यात आली.