जागतिक आरोग्य दिनानिमित्त जेजुरीत महाआरोग्य शिबिर, ६७२ रुग्णांची तपासणी
माजी आमदार संजय जगताप यांनी या महाआरोग्य शिबिराला दिली भेट
जेजुरी, दि. ९
श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट,जेजुरी ग्रामीण रुग्णालय, समर्थ युवा फाउंडेशन व जेजुरीकर श्रीराम मंदिर यांच्या वतीने श्रीराम नवमी उत्सव व जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात ६७२ रुग्णांनी आरोग्य तपासणी केली
या आरोग्य मेळाव्यामध्ये रक्तातील साखर, कोलेस्ट्रॉल इत्यादी तसेच रक्तदाब तपासणी, डोळ्यांचे तपासणी , मोफत चष्मे वाटप, दातांची तपासणी ,महिलांसाठी मॅमोग्राफी म्हणजे कर्करोग निदान तपासणी करण्यात आली . जेजुरी मध्ये पहिल्यांदाच सुमारे 13,500 रुपयांच्या तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात आल्या असल्याचे आयोजक डॉ राजेंद्र खेडेकर यांनी सांगितले.
दिनांक ६ रोजी २७२ रुग्णांनी व दिनांक ७ रोजी ४०० रुग्णांनी या शिबिरात तपासणी केली.या महाआरोग्य शिबिराला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.
तर शिबिरात मेमोग्राफी करण्यासाठी महिलांची संख्या लक्षणीय होती.
माजी आमदार संजय जगताप,जेजुरी पालिकेचे मुख्याधिकारी चारूदत्त इंगुले ,ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ प्रताप साळवे,अड मंगेश जेजुरीकर,जेजुरी उद्योजक संघाचे कार्याध्यक्ष रवींद्र जोशी,माजी नगरसेवक सचिन सोनवणे,अजिंक्य देशमुख,सुशील राऊत, अनिल पोकळे,हरिभाऊ लांघी आदींनी या शिबिराला भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले.
या महाआरोग्य शिबिरात समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे
व्यवस्थापक सुनील पांडे, महेश सकपाळ
डॉ. तन्मयी देशपांडे ,डॉ. प्रियंका मिसाळ, डॉ. प्रियंका पवार, डॉ अनघा थोरात ,डॉ. प्रिया कर्डे ,डॉ. पायल धावले ,डॉ. विजया जाधव, दिपक ओव्हाळ, अनिकेत कांगने यांनी या शिबिराला सहकार्य केले.