Purandar Reporter morcha
निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याचा पुरंदर मध्ये निषेध
जेजुरी, दि.१३ सासवड (ता पुरंदर) येथे निखिल वागळे यांच्यावर पुण्यात झालेल्या हल्ल्याचा पुरंदर तालुका पत्रकार संघाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. त्याच बरोबर संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली या बाबतचं निवेदन सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांना देण्यात आले.
सासवड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून शिवतीर्थ ते पोलीस स्टेशन असा मोर्चा पत्रकारांच्या वतीने काढण्यात आला. यावेळी हल्लेखोरांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सरकार पुरस्कृत काही व्यक्ती घाला घालत आहेत. असा आरोप यावेळी करण्यात आला.
पत्रकारांवरील हल्ले खपून घेतले जाणार नाही. त्याच बरोबर पत्रकार संसक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष बी एम काळे यांनी यावेळी केली.
यावेळी पुरंदर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामथे, प्रवीण नवले, अमोल बनकर, निलेश भुजबळ, एम.जी शेलार, दत्ता भोंगळे, बी एम काळे, सुनील लोणकर, राहुल शिंदे, निखिल जगताप, संतोष डुबल, किशोर कुदळे, संतोष जंगम, एन.आर जगताप, निलेश जगताप, आजिम आत्तार, हनुमंत वाबळे, सुनील धिवार, सुजाता गुरव, छाया नानगुडे, शिवदास शितोळे, अमृत भांडवलकर, ए.टी माने, राजेश काकडे,
बाळासाहेब पवार, नवनाथ राणे, बाळासाहेब धुमाळ, रामदास लांघी, श्रीकांत लक्ष्मी शंकर, शिवाजी राणे, उपस्थित होते.