अपघातजेजुरीमहाराष्ट्र

जेजुरीतील श्री कडेपठार येथे दर्शनाला जाताना नाशिक जिल्ह्यातील भाविकाचा हृदयविकाराने मृत्यू…

प्रतिनिधी

जेजुरी, दि. ६

रोजी जेजुरी येथील श्री कडेपठार येथे दर्शनासाठी जात असताना नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील संजय महादू थेटे, रा. उम्राळे ता. दिंडोरी, जि. नाशिक (वय ५५ वर्षे ) या भाविकाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद मृत्यू झाल्याची घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित भाविक दर्शनासाठी जेजुरी कडेपठार गडावर जात असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली. यावेळी श्री कडेपठार देवसंस्थानचे कर्मचारी मयूर खोमणे, शिवाजी भंडलकर,अनिकेत कुदळे व धनंजय नाकाडे यांनी तत्परता दाखवत त्या भाविकाला पायरी मार्गाने खाली आणले.
त्यानंतर श्री मार्तंड देवसंस्थानच्या ॲम्ब्युलन्सचे चालक प्रतीक वखरे यांनी ॲम्ब्युलन्समधून त्यांना जेजुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तपासणीदरम्यान डॉक्टरांनी त्या भाविकाला मृत घोषित केले.
दरम्यान, जेजुरी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी ग्रामीण रुग्णालयात दाखल होऊन पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
या घटनेमुळे जेजुरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page