जेजुरीत दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत पथदिवे बसविण्याच्या कामांचा शुभारंभ
प्रतिनिधी
जेजुरी ,दि १५
जेजुरी नगरपरिषदेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत आनंदनगर मुख्य चौक ते सोनवणे घर आदी सुमारे २किलो मीटर परिसरामध्ये पथदिवे उभारण्यास प्रारंभ करण्यात आला . शुक्रवारी ( दि.१३) या कामांचा शुभारंभ करताना नगरसेविका स्नेहल भालेराव , मेघा उबाळे , स्वरूपा खोमणे , नगरसेवक कृष्णा कुदळे , योगेश जगताप ,शिवाजी जगताप, सत्यवान उबाळे ,गौतम भालेराव , सुशील राऊत , ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे ,जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष तानाजी जगताप , सुरेश उबाळे , आदी उपस्थित होते . सुमारे ७५ लक्ष रुपयांचे हे काम असून यामध्ये ९१ पथदिवे उभारण्यात येणार आहेत.एटीएस इलेक्ट्रिक या कंपनीला हे काम देण्यात आलेले आहे. तसेच त्यांच्याकडून ३ वर्षांची गॅरंटी घेण्यात आलेली आहे.पुढील काळात जेजुरी शहराच्या मुख्य चौकात सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे नगरसेवक योगेश जगताप यांनी सांगितले आभार पंढरीनाथ जाधव यांनी मानले.
जेजुरी शहरात तसेच कडेपठार रोड वर बसवण्यात आलेले पथ दिवे अनेक महिन्यापासून बंद आहेत त्यांची ही त्वरित दुरुस्ती व्हावी अशी जेजुरीकर नागरिक तसेच कडेपठार मंदिराकडे देवदर्शनाला जाणारे भाविक नित्य वारकरी सेवेकरी यांच्याकडून मागणी होतं आहे.




