पुरंदरचा डंका देशभर, सख्या भावांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळणार

पुरंदर, दि. ८ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्वाकांक्षी समजल्या जणार्‍या स्वच्छ भारत अभियानातील स्वच्छ सर्वेक्षणात सासवडचे नाव देशाच्या पटलावर पोहचले आहे. केंद्रशासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सासवड नगपालिकेस स्वच्छ्तेसाठी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू हस्ते गौरविण्यात येणार असून हा पुरस्कार पुरंदरचे आमदार संजय जगताप स्विकारणार आहेत.

तर मध्य प्रदेशातील महू कॅन्टोन्मेंटलाही विशेष पुरस्कार मिळाला असून आमदार जगताप यांचे भाऊ आणि महू कॅन्टोन्मेंटचे मुख्याधिकारी म्हणून राजेंद्र जगताप यांनाही राष्ट्रपती मुर्मू यांच्या यांंच्या हस्ते गौरविले जाणार आहे. येत्या ११ जानेवारी रोजी दिल्ली येथे हा कार्यक्रम होणार आहे.

विशेष म्हणजे एकाच घरातील दोघा भावांना सलग दुसर्‍या वर्षी हा पुरस्कार मिळणार असल्याचा हा दुर्मिळ योगायोग आहे. राजेंद्र जगताप हे २०२१ ते आॅगस्ट २०२३ या कालावधीत महू कॅन्टोन्मेंट कार्यरत होते. तर, सध्या ते पुण्यात दक्षिण कमान येथे संयुक्त विदेशक म्हणून कार्यरत आहेत.

सलग दुसर्‍यावर्षी पुरस्कार –

मागील वर्षी (२०२२) सासवड नगर परिषदेस स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत विषेश परितोषिकाने गौरविण्यात आले होते. यावेळी केंदीयमंत्री हरदिपसिंग पुरी यांच्या हस्ते नगरपरिषदेस देण्यात आलेला पुरस्कार आमदार संजय जगताप यांनी स्विकरला होता. तर, महू कॅन्टोंन्मेंटची जबाबदारी राजेंद्र जगताप यांच्याकडे असताना महू बोर्डास देशातील स्वच्छ कॅन्टोंन्मेंट मध्ये महूला तिसरा क्रमांक मिळाला होता,

त्याचा पुरस्कार राजेंद्र जगतपा यांना केंद्रीयमंत्री पूरी यांच्याच हस्ते देण्यात आला. त्यानंतर सलग दुसर्‍यावर्षी सासवड आणि महू बोर्डास विशेष पुरस्काराने गौरविले जाणार असून यावेळी दोन्ही भावांना राष्ट्रपतीच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

या पुरस्काराचा विशेष आनंद आहे. मागील वर्षीही आम्हाला एकाच वेळे पुरस्कार मिळाला होता. महू येथे असताना स्वच्छतेसाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे यंदाही महूला पुन्हा एकदा पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे.

– डाॅ. राजेंद्र जगताप (संयुक्त विदेशक दक्षिण कमान)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page