नववर्षा निमित्त जेजुरी गडावर भाविकांची गर्दी
नववर्षा निमित्त जेजुरी गडावर भाविकांची गर्दी.
जेजुरी, दि. १ जानेवारी नवीन वर्षानिमित्त महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर देवदर्शनासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी व कुलदैवत खंडोबा देवाच्या दर्शनासाठी गुरुवार दिनांक १ रोजी पहाटे पासूनच हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
देवदर्शन, भंडाराची उधळण कुलधर्म कुलाचार नुसार तळी भंडार, जागरण गोंधळ, आदी विधी भाविकांनी जेजुरी गडावर केले. जेजुरी गड, पायरी मार्ग, शहरातील सर्व पेठा, ऐतिहासिक चिंचेची बाग, कडेपठार पायथा भाविकांनी हाऊसफुल झाला होता.
जेजुरी देवसंस्थानच्या वतीने भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्था, पाणी स्वच्छता , अन्नदान आदी सुविधा उपलब्ध केल्या होत्या




