सरत्या वर्षाला धुंदीत नको, शुद्धीत निरोप द्या, व्यसनमुक्त संघटना अडीच हजार नागरिकांना दुधाचे वाटप
प्रतिनिधी
जेजुरी, दि. २ महाराष्ट्र व्यसनमुक्त युवक संघ,पुरंदर तालुका यांच्या वतीने व्यसना विरोधात तरुणांना मध्ये जनजागृती करण्यासाठी सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी सलग १० व्यां वर्षी ‘दारू नको’ दूध प्या’ हा उपक्रम जेजुरी गडाच्या पायथ्याशी राबविण्यात आला.
हभप बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्त युवक संघ पुरंदर तालुका शाखेच्या वतीने ३१ डिसेंबर रोजी जेजुरी गडाच्या पायथ्याशी नागरिक व भाविकांना मसालेदार दुधाचे वाटप करून व्यसना विरोधात जनजागृती करण्यात आली.
सरत्या वर्षाला धुंदीत नव्हे तर शुद्धीत निरोप द्या,कोणतेही व्यसन करू नका,नका लावू चुना ,हा जन्म नाही पुन्हा पुन्हा अशा घोषणा देवून व्यसन मुक्तीसाठी शपथ घेण्यात आली.
संघाच्या वतीने वर्षभर वृक्षरोपन ,बाल संस्कार शिबीरे,,आपत्कालीन काळात ग्रस्तांना मदत, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात व्यसनमुक्त जनजागृती,शैक्षणिक साहित्य वाटप,स्वच्छता अभियान,गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत आदी उपक्रम संघाच्या वतीने राबविण्यात येत असल्याचे संघाचे पदाधिकारी तुषार देशमुख,आनंद नाईक यांनी सांगितले.
या उपक्रमाचे आयोजन आनंद नाईक, तुषार देशमुख, बाळासाहेब काळे, अनंत देशमुख, प्रिन्स पासवान, ओम राऊत, विशाल बारसुडे, सुनील जगताप, समर्थ राऊत, सोहम काळे, समर्थ नाईक. मच्छिंद्र नागरगोजे आदींनी केले.




