जेजुरीपुणेपुरंदरशिक्षणसामाजिक

विद्यार्थी हेच देशाचे उद्याचे खरे शिल्पकार – संतोष जगताप

प्रतिनिधी
साकुर्डे , दि. १८ साकुर्डे (ता. पुरंदर ) येथील मातोश्री जिजाई सोपानराव जाधव माध्यमिक विद्यालयामध्ये स्वतंत्र भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. स्वर्गीय एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कला शिक्षक दत्तात्रय शिंदे व माधुरी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत आकर्षक रांगोळ्या व फुलांची सजावट करण्यात आली. सह शिक्षक किशोर दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील आर. एस. पी. युनिट च्या विद्यार्थ्यांनी ध्वजाला मानवंदना तर उपस्थितांना सलामी दिली. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिस्तबद्द कवायत सादर केली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संतोष जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की तुम्ही उद्याच्या उज्वल भारताचे आधारस्तंभ आहात. जीवनात उच्च ध्येय ठेवा. आपल्या आई वडिलांचा व मोठ्यांचा आदर करा व आपल्या ध्येयप्राप्ती साठी जीवाचे रान करा.
यावेळी स्वर्गीय एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानच्या वतीने हायस्कुल व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन अशा ४२५ फुलस्केप वह्या भेटस्वरूपात देण्यात आल्या त्याचं बरोबर हायस्कुलमधील विद्यार्थ्यांना थंड पिण्याच्या पाण्यासाठी कुलर बसवून देण्याचे जाहीर केले.
साकुर्डे गावचे सरपंच राजेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला माजी सरपंच राजेंद्र सस्ते, रमेश जाधव, ध्रुव शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुरेश जाधव, खजिनदार किसन देशमुख, संचालक प्रकाश जाधव, विठ्ठल चव्हाण, राहुल भोंगळे, सुरेश सस्ते, वामन सस्ते, दत्तात्रय जाधव, पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीचे सचिव तानाजी झेंडे, एकनाथ चव्हाण, सुरेशनाना सस्ते, युवराज जगताप, सोमनाथ जाधव, मापन्ना बनसोडे, सौ. चव्हाण सर्व शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने साकुर्डे ग्रामस्थ उपस्थित होते.
विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक तानाजी झेंडे यांनी विद्यालयास रु. ६५००० किमतीचे ९ ब्रास पेव्हिंग ब्लॉक बसवून दिले व माजी विद्यार्थी सोमनाथ जाधव यांनी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने रु दीड लाख खर्च करून विविध खेळांची मैदाने तयार करून दिल्याबद्दल त्यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश कामथे यांनी केले. सूत्रसंचलन किशोर दरेकर व विद्या पवार यांनी तर आभार श्वेता काटे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page