बेलसर प्राथमिक आरोग्य केंद्राकडून वारकऱ्यांना औषध वाटप व तपासणी
प्रतिनिधी
जेजुरी, दि. २५ श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सासवड हून जेजुरीत येताना साकुर्डे बेलसर फाटा येथे बेलसर प्राथमिक आरोग्य केंद्राकडून वारकऱ्यांची मोफत आरोगये तपासणी आज औषधांचे वाटप करण्यात येत होते.
बेलसर आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. बोराडे, आरोग्य अधिकारी डॉ. कुदळे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. पौर्णिमा पांडव, अश्विनी माधव, आरोग्य सेविका श्रीमती निरपासे, आशा कार्यकर्त्या वनिता लोंढे, मयुरी गोसावी, स्मिता जगताप, पूनम जगताप, रोहिणी माकर, आशा भंडलकर, विजय चव्हाण यांनी संपूर्ण दिवसभर सोहळ्यातील वारकऱ्यांना आरोग्य सुविधा पुरवली.