पुरंदर मध्ये संजय जगताप यांच्या विरोधात कोण?लढत दुरंगीच राहणार

पुरंदर मध्ये संजय जगताप यांच्या विरोधात कोण?लढत दुरंगीच राहणार

जेजुरी, ( बी एम काळे ) पुढील महिन्यात होऊ घातलेल्या पंचवार्षिक विधानसभा निवडणूकीसाठी पुरंदर हवेली मतदार संघात युती आघाडीत दुरंगी सामना रंगणार असला तरी ही जागावाटपातून ही जागा आपल्याच पक्षाला जागा मिळावी म्हणून सामुदाईक प्रयत्न करतानाच, उमेदवारी मात्र स्वतःला मिळावी असे प्रयत्न करताना अनेकजण मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत.
पुरंदर हवेली मतदार संघांचे विद्यमान आ. संजय जगताप यांची या निवडणूकीची उमेदवारी फिक्स असल्याने त्यांच्या विरोधात कोण? असा प्रश्न तालुक्यातील मतदारांत आहे. सद्या भाजप, शिवसेना ( शिंदे गट ) शिवसेना ( ठाकरे गट ) राष्ट्रवादी (शरद पवार ), राष्ट्रवादी (अजित पवार गट )या पक्षांकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांनी आपापल्या पक्षांकडे मागनी केलेली आहे. यात भाजप पक्षाकडून इच्छु्कांची संख्या मोठीं आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, माजी आमदार अशोक टेकवडे, माजी जि प सदस्य बाबाराजे जाधवराव, कात्रज दूध संघांचे माजी संचालक गंगाराम जगदाळे आदींनी पक्षाकडून उमेद्वारी मिळवण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. तालुक्यात तसे वातावरण ही निर्माण कारण्यात येत आहे. भाजपचेच गंगाराम जगदाळे यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच असा निर्धार व्यक्त करीत गेल्या दोन महिन्यापासून तालुक्यातील मतदारांना सहली काढून देवदर्शन घडवण्यात येत आहे. तीच पद्धत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे इच्छुक माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांनी ही अवलंबली आहे. त्यांनी मात्र गेले वर्षभर मतदार संघात मोठा खर्च केला आहे. पिण्याच्या पाण्याचे टँकर, जनावरांना चारा वाटप, देवदर्शन सहली काढून जण माणसात प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात त्यांना यश ही आले आहे. आज ते राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून इच्छुक आहेत. आघाडी झाली तरी ही निवडणूक लढवण्यावर ते ठाम आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून माजी मंत्री विजय शिवतारे, सेनेचे जिल्हाप्रमुख दिलीप यादव इच्छुक आहेत. यात विजय शिवतारे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक आहे. शिवतारे यांनी ही स्वतःचे नाव छापलेल्या साड्यांचे वाटप सुरु केले आहे. मात्र त्यांच्या तब्बेतीचा प्रश्न पक्षातील कार्यकर्त्यांनातून चर्चेत येतो. तब्बेत साथ देणार का? असा संभ्रम ही कार्यकर्त्यांत आहे. यामुळे स्वतः विजय शिवतारे माघार घेऊन विश्वासू व्यक्तीला किंवा कुटुंबातील कोणालाही पुढे करू शकतात अशी ही चर्चा आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटात ही जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ.दिगंबर दुर्गाडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्ता झुरंगे प्रबळ दावेदार मानले जात आहेत गेल्या महिन्यात आम्हा दोघांपैकी कोणाला ही उमेदवारी मिळाली तरी एकजुटीने काम करू अशी ग्वाही त्यांनी मेळावा घेऊन राज्यसभेच्या खा. सुनेत्रा पवार यांना दिली आहे.
शिवसेना ठाकरे गटाकडून तालुकाप्रमुख अभिजित जगताप, हवेलीतून शंकरनाना हरपळे, संदीप धाडसी मोडक उल्हास शेवाळे यांनी ही पक्षाकडे उमेदवारी मागीतली आहे. मनसे सारखा पक्ष तालुक्यात आहे की नाही असाच प्रश्न या निमित्ताने चर्चेत राहिला आहे.

एकीकडे पक्षाकडून उमेदवारी मिळावी, पुरंदर हवेली मतदार संघ आपल्याकडेच राहावा या साठी सर्वच पक्ष नेते कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या जातं आहेत. मेळावे आयोजित करून वातावरण निर्मिती केली जातं आहे. मात्र राज्यात आघाडी आणि युती चा प्रयोग होत असल्याने इच्छुक केवळ आपणच उमेदवार असणार अशा अविर्भावात वावरताना दिसत आहेत. युती आणि आघाडीचा प्रयोग फसलाच तर मात्र इच्छु्कांची मोर्चेबांधणी कामाला येणार आहे. हे ही तितकेच खरे आहे.
निवडणुक आयोगाकडून निवडणूकीची घोषणा केली आहे. पुढील महिन्यात २०नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. उरलाय एक महिना फक्त. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात ही झाली आहे. आजपर्यंत अनेकाइच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतलेले आहेत. येत्या २९ ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. ४ नोव्हेंबर पर्यंत अर्ज माघारी घेतले जाणार आहेत. त्यानंतरच निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
तोपर्यंत मात्र ‘आला रे आला, गेला रे गेला ‘अशीच स्थिती राहणार आहे. काँग्रेस कडून विध्यमान आमदार संजय जगताप यांच्या उमेद्वारीला कोणतीच अडचण नसणार आहे. प्रश्न आहे त्यांच्या विरोधात कोण असणार? आणि हीच चर्चा आजतरी संपूर्ण मतदार संघात आहे. याशिवाय कोणी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलाच तर पुरंदर ने कधीही अपक्ष उमेदवाराला साथ दिलेली नाही. चित्र बहुरंगी असले शेवटी लढत ही दुरंगीच होणार हे मात्र खरे. अपक्ष कोणाची किती मते खाणार यावर निकाल अवलंबून राहणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page