जितेंद्र कुंजीर यांची संचालकपदी बिनविरोध निवड; शिक्षक संघातील स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा विजय

प्रतिनिधी
पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी यादववाडी केंद्राचे केंद्रप्रमुख तथा शिक्षक नेते जितेंद्र कुंजीर यांची बिनविरोध निवड झाली.या निवडीमुळे शिक्षक संघातील निष्ठावंत,कट्टर व प्रामाणिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
सेवानिवृत्त संचालक राजेंद्र कुंजीर यांच्या रिक्त जागेवर विरोधी पॅनलमधील पराभूत उमेदवारांना संधी देण्याचे डावपेच सुरु होते.मात्र,संघटनेतील स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी हा प्रयत्न वेळीच हाणून पाडत जितेंद्र कुंजीर यांना पुढे करत संचालकपदासाठी अर्ज दाखल केला.
शिक्षक समितीचे अध्यक्ष सुनील कुंजीर यांनीही अर्ज दाखल केला होता.परंतु पतसंस्था ऐक्य,परंपरा व सहकाराची भूमिका लक्षात घेत त्यांनी अर्ज माघारी घेतल्याने जितेंद्र कुंजीर यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.
सध्या पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघात विलीनीकरणानंतर काही निर्णय निष्ठावंत कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता घेतले जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे संघटनेत अद्याप मनोमिलन न झाल्याची चर्चा आहे.
या पार्श्वभूमीवर संघटनेतील मरगळ झटकून निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी जितेंद्र कुंजीर यांचे नेतृत्व निर्णायक ठरणार आहे.असा विश्वास व्यक्त होत आहे. सहकार व संघटन क्षेत्रातील त्यांचा अनुभव पतसंस्था व शिक्षक संघाला नवी दिशा देईल अशी चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page