पुणेपुरंदरशिक्षणसामाजिक

मुख्यमंत्री फेलोशिपधारकांच्या वेतनाचे गौडबंगाल झेडपीच्या काँटिजन्शी फंडातून रक्कम दिल्याचे उघड, गजानन पाटलांचा अजून एक प्रताप

प्रतिनिधी

पुणे, दि. १८ जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या मुख्यमंत्री फेलोशिपच्या उमेदवारांचे वेतन जिल्हा परिषदेच्या कॉन्टिजन्सी फंड म्हणजे ‘सादिल लेखाशर्ष मधून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.झेड पी च्या सीओ चा अजून एक प्रताप उघड झाली आहे.
या निधीमाध्ये बचत करून हे पैसे दिले. त्यासाठी जिल्हा नियोजन विभागाची परवानगी घेतल्याचा दावा केला जात आहे.

जिल्हा परिषदेला प्राप्त होणाऱ्या निधीमधून चार टक्क्यांपर्यंत रक्कम ही कारणे खर्च म्हणजे सादिल निधी जमा होत असतो, त्यामधून कार्यालयीन खर्च चालवला जावा, असा प्रघात आहे. मात्र, जिल्हा परिषदेने यातील सुमारे ४२ लाख रुपये हे मुख्यमंत्री फेलोशिप मिळालेल्या उमेदवारांच्या वेतनापोटी खर्च केल्याचे समोर आले आहे. वास्तविक ‘सादिल’मधून करावयाची कामे अथवा तरतुदी या विशिष्ट कामांवर त्या मर्यादित आहेत, मुख्यमंत्री फेलोशिप मिळालेल्या उमेदवारांना त्यांचे वेतन किवा शिष्यवृत्तीची रक्कम ही शासन निधीतून उपलब्ध होते. मात्र, निकष डावलून वेतनावर हा खर्च केला गेल्याची माहिती आहे.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार हे वेतन देण्यासाठी जिल्हा नियोजन विभागाची परवानगी घेतल्याचा दावा केला जात आहे. मात्र, शासनाच्या नियमावलीत अशी परवानगी घेणे आणि ‘सादील मधून तात्पुरत्या वेतनावर खर्च करणे अपेक्षित नाही, अशी परवानगी देण्याचे अधिकार जिल्हा नियोजन विभागाला आहेत का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मुख्यमंत्री फेलोशिप किती दिवसांची?

मुख्यमंत्री फेलोशिप मिळालेले उमेदवार हे काही महिन्यांसाठी जिल्हा परिषदेकडे असतात अनेकजण विहित कालावधी झाला तरी कार्यरत आहेत. नक्की कितीजण कार्यरत आहेत, याबद्दल प्रशासकीय अधिकाऱ्यांनादेखील पूर्ण माहिती नाही. त्यांच्या नेमणुका, त्यांचे वेतन तसेच कामकाजासंदर्भात त्यांची नियमावली, अधिकार याबद्दल सुसूत्रता दिसून येत नाही. यातील अनेकजण जिल्हा परिषदेच्या खातेप्रमुखांच्या बैठका घेतात. भेट फायली सह्या घेण्यासाठी आणतात. गेल्या आठवड्यात एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने भाषणासाठी माहिती मागवली; परंतु त्यांच्याकडून माहिती देण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे मुख्यमंत्री फेलोशिपचे उमेदवार, त्यांची कार्यपद्धती वादग्रस्त ठरत नाहे. असे साधारण १० ते बारा जण अजुनही झेड पीत कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page