पुरंदर ला मिळणार अजून एक शिक्षक आमदार
पुणे शिक्षक मतदारसंघात ‘महायुती’कडून प्राचार्य नंदकुमार सागर यांच्या नावाची चर्चा
आमदार आसगावकरांपुढे मोठे आव्हाण
पुरंदर, दि. २६ विधान परिषदेच्या पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघात यंदा मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या निवडणुकीत पुणे जिल्ह्याचे शिक्षक नेते प्रा. नंदकुमार सागर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली असून पुरंदर तालुक्याला अजून एक आमदार मिळणार असल्याचे ही म्हटले जात आहे.
लवकरच शिक्षक मतदार संघातून शिक्षक आमदार निवडणूक होतं आहे. प्रा. नंदकुमार सागर या निवडणूक लढावण्याची गेल्या वर्षभरापासून प्रयत्न करीत आहेत. भाजपा कडून त्यांनाच संधी मिळेल अशी अनेकांना खात्री आहे. यामुळे विद्यमान आमदार जयंत आसगावकरांना मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण अनेक शिक्षक नेते आमदार होण्यासाठी मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.
या निवडणुकीत महायुतीच्या वतीने प्राचार्य नंदकुमार सागर हा शिक्षण चळवळीतील शिक्षकांचे नेतृत्व करणारा चेहरा देण्याचे सूतोवाच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले आहे. यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. प्राचार्य सागर हे शिक्षकांच्या समस्यांची जाण असणारे आणि गेली तीन दशके शिक्षक संघाचे काम करणारे नेते आहेत. सातत्याने मोर्चे, आंदोलने यातून त्यांनी शिक्षक-शिक्षकेतरांसाठी न्याय भूमिका घेतली आहे. त्यांना विविध शिक्षक संघटनांचा पाठिंबा मिळत आहे, मतदार नोंदणीतही आघाडी घेतली असून त्यांनी जोरदार तयारी सुरु केलेली आहे. असे संकेत भाजपाकडून मिळाले आहे. प्राचार्य सागर यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला असून, ते महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव आणि जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. जेजुरी येथील जिजामाता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे ते प्राचार्य आहेत. सध्याच्या राजकारणात किती पराकोटीची स्पर्धा आहे हे नव्याने सांगायला नको, बाप लेक, भाऊ भाऊ, वहिनी दीर यांचा आमदारकीसाठी संघर्ष,साठमारी उभ्या महाराष्ट्राला परिचित आहे,कित्येकांची घरे यापायी फुटली पण आपल्या संस्थेतील एका कर्मचाऱ्याला विधिमंडळात शिक्षण क्षेत्रातील प्रश्न हिरीरीने व अभ्यासपूर्ण मांडता यावेत व शिक्षकांचाच रास्त प्रतिनिधी प्रा. नंदकुमार सागर यांच्या रुपात आमदार व्हावा यासाठी प्रयत्न करणारा माजी आमदार संजय जगताप यांच्यासारखा संस्थाचालक त्यांच्या मागे असल्याची जमेची बाजू ही आहे.
आसगावकर, सावंत मैदानात; इतरांचीही तयारी
प्राचार्य नंदकुमार सागर यांच्या विरोधात विद्यमान आमदार जयंत आसगावकर आणि माजी आमदार दत्ता सावंत हे ताकदीने मैदानात उतरणार हे निश्चित आहे. गतवेळी महाविकास आघाडीची सत्ता असल्याने आसगावकरांना उमेदवारी मिळाली होती आणि आमदार सतेज पाटील यांनी ताकद पणाला लावत त्यांना यश मिळवून दिले होते. यंदा राज्यात महायुतीची सत्ता असल्याने त्यांनी ताकदीचा उमेदवार उतरवण्याची तयारी केली आहे.
माजी आमदार दत्ता सावंत यांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे, माजी आमदार भगवानराव साळुंखे, ‘शिक्षक भारती’चे पुणे विभागीय अध्यक्ष दादा लाड, महाराष्ट्र राज्य विनाअनुदान कृती समितीचे खंडेराव जगदाळे, विजयसिंह माने, बाबासाहेब पाटील, दौलत देसाई, अमोल काळे, कौस्तूभ गावडे, जे. के. थोरात, भरत रसाळे यांच्यासह अनेक जण रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत.
दरम्यान, सर्वच उमेदवारांकडून
मतदार नोंदणी जोरात सुरु असून सुमारे ८० हजारापर्यंत नोंदणीची शक्यता वर्तवण्यात येत आहे
पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी पुढील वर्षी डिसेंबर महिन्यात मतदान होण्याची शक्यता आहे, मात्र यासाठी सध्या मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ‘ज्याची नोंदणी जास्त, त्याची ताकद मोठी’ असा सूर ऐकायला मिळत असल्याने इच्छुकांनी सध्या सारी ताकद मतदार नोंदणीसाठी लावली आहे. किमान ८० हजारापर्यंत मतदार नोंदणी होण्याची शक्यता आहे.
पुणे शिक्षक मतदार संघाचे भाजपाचे नोंदणी प्रमुख डॉ प्रशम कोल्हे यांनीही नंदकुमार सागर यांच्या तळागाळातील काम संघटनात्मक कुशलतेचे कौतुक केले आहे.
दरम्यान, या शिक्षक मतदार संघात शिक्षकच आमदार पाहिजे आणि शिक्षकांतीलच उमेदवार असावा, अशी मागणी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील पाचही जिल्ह्यातील मतदारांतून होत आहे. निवडणुकीला वर्षाचा अवकाश असला, तरी आतापासूनच जोरदार चर्चा सुरू झाली आहे.




