जेजुरी जिजामाता विद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा
जेजुरी जिजामाता विद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा
जेजुरी, दि. २१ माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून संपूर्ण राज्यात बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा बुधवार दि. २१ पासून सुरू झाल्या असून जेजुरी येथील जिजामाता महाविद्यालयातील बारावीच्या परीक्षा केंद्रात परिक्षेनिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
जेजुरी जिजामाता महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राचे उद्घाटन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर,जेजुरी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे,नगरसेवक अजिंक्य देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक दादा उबाळे, अलीम बागवान, जेजुरी देवसंस्थानचे माजी विश्वस्त नितीन राऊत,केंद्र प्रमुख सतीश पिसाळ,उपकेंद्र प्रमुख किरण मोडक,प्राचार्य अनिल रासकर,प्राचार्य शहाजी कोळेकर शाळा समन्वयक प्रल्हाद गिरमे ,बाळासाहेब जगताप,अनिल पोकळे आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी तणावमुक्त व कॉपी मुक्त वातावरणात परीक्षा द्यावी,केंद्राची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखावी असे आवाहन यावेळी प्राचार्य नंदकुमार सागर यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
बारावीच्या परीक्षेसाठी या केंद्रावर जेजुरी व शीवरी येथील ४९३ परीक्षार्थी सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ उबाळे यांनी केले.