जेजुरीधार्मिक

जेजुरी गडावर खंडोबा देवाचा रंग पंचमी उत्सव साजरा मूर्तींना रंग लावून अनोखी पूजा -अभिषेक

जेजुरी ,दि .१० भारतीय लोककला संस्कृतीमधील लोकदेव आणि बहुजन बांधवांचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाचे वर्षातील जत्रा -यात्रा ,सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात ,यातूनच बहुरंगी -बहुढंगी लोककला संस्कार परंपरेचे आणि सामाजिक बांधीलकीचे अनोखे दर्शन येथे घडत असते ,याच सण उत्सवांची परंपरा म्हणून कुलदैवताची राजधानी असलेल्या जेजुरीच्या गडावर खंडेरायाची रंगपंचमी मोठ्या श्रद्धेने साजरी करण्यात आली.
नित्य वारकरी, पुजारी सेवक वर्ग आदींसह ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते ,यावेळी प्रातःकाळची भूपाळी पूजा -अभिषेक व आरती झाल्यानंतर मुख्य भैरवनाथ मूर्तींसह स्वयंभू लिंगाला विविध रंग लावण्यात येऊन देवांची रंगपंचमी साजरी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page