विजयी मिरवणुकीत भेसळयुक्त भंडाऱ्याचा भडका, १६ जण भाजलेदोन नवनिर्वाचित सदस्यांचा समावेश

जेजुरी प्रतिनिधी

दि.२१  जेजुरीत मतमोजणी पार पडून निकाल जाहीर झाल्यानंतर गडाच्या पहिल्या पायरीजवळ खंडेरायाचरणी भंडारा अर्पण करून आशीर्वाद घेताना भंडाऱ्याचा भडका होऊन त्यामध्ये सुमारे १६ जण प्रचंड भाजले.यामध्ये आताच निवडून आलेल्या राष्ट्रवादी कांग्रेसच्या नगरसेविका मोनिका राहुल घाडगे व त्यांचे पती राहुल घाडगे यांचातसेच प्रभाग क्र.५मधून निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेविका कु.स्वरूपा खोमणे आदींचा समावेश आहे ही घटना दुपारी ३वाजण्याच्या सुमारास घडली घटनेत होरपळलेल्या -भाजलेल्या जखमींना तातडीने येथील खाजगी व सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पोलिसांनीही घटना स्थळी धाव घेतली.व परिस्थितीची माहिती घेतली आहे.
याबाबतचे थोडक्यात वृत्त असे की, येथील मल्हार नाट्यगृह येथे मतमोजणी व निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार व कार्यकर्ते खंडोबा गडाच्या पहिल्या पायरीजवळ भंडारा अर्पण करण्यासाठी गेले होते .या ठिकाणी कार्यकर्त्यांनी उधळण केलेल्या भंडाऱ्याने अचानक पेट घेतला व स्फोटही झाला या मध्ये सुमारे १६जण भाजले असून यात महिलांचा समावेश आहे.जखमींची नावे पुढील प्रमाणे —-१)रुपाली खोमणे २)विलास बारभाई , ३)सानिका गाढवे , ४) संस्कार गलांगे , ५)देवल बारभाई , ६)मनीषा चव्हाण ,७)रजनी बारभाई , ८)स्वप्नील लाखे , ९)अनिल बारभाई , १०)गणेश चव्हाण ११)निशा दादा भालेराव १२)लक्ष्मी माऊली खोमणे १३) मोनिका राहुल घाडगे ( नवनिर्वाचित नगरसेविका )१४)राहुल कृष्णा घाडगे ,१५ )कु.स्वरूपा जालिंदर खोमणे (नवनिर्वाचित नगरसेविका ) १६)उमेश भंडलकर

घडलेली घटना भेसळयुक्त केमिकल भंडाऱ्यामुळे घडल्याची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page