एखतपुर येथे गाव चलो अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
एखतपुर येथे गाव चलो अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
जेजुरी, दि. १६ भारतीय जनता पक्षाच्या गाव चलो अभियानाला एखतपुर मुंजवडी मोठा प्रतिसाद मिळाल्याचे प्रदेश भाजपा चे निमंत्रित सदस्य अड् श्रीकांत ताम्हाणे यांनी सांगितले.
आगामी काळात निवडणूका होत असून भाजप ने ग्रामीण भागात शासकीय योजनांची अंमलबजावणी त्याचबरोबर मोदी सरकारच्या कामाचा आढावा प्रत्येक बूथ स्तरावर घेण्याच्या सूचना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्याना दिल्या आहेत.
त्यानुसार राज्यभरात जी मोहीम राबवली जात असून पुरंदर तालुक्यात ही भाजपचे निमंत्रित सदस्य अड् श्रीकांत ताम्हाणे यांच्या नेतृत्वाखाली एखतपूर मुंजवडी येथे या मोहिमेअंतर्गत प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे श्री.ताम्हाणे यांनी सांगितले. या मोहिमेत मोदी सरकारच्या योजनाच्या गेल्या दहा वर्षात लाभ घेतलेले नागरिक, शेतकरी, बचत गट प्रमुख, शालेय विद्यार्थी यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. त्यांची मते जाणून घेतली. ग्रामीण भागातील समस्यांचा आढावा ही घेण्यात आला. प्रत्येक बुथवर ५१ टक्के पेक्षा जास्त मतदान कसे होईल याबाबत मार्गदर्शन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
यावेळी केतन खळदकर, सागर चौरे, आकाश झुरंगे, अमित मोरे, हेमंत कुंभार, विजय गिरमे, दादा टिळेकर, अभिषेक झुरंगे आदी मान्यवर सहभागी झाले होते