या महिन्यात पाऊस नाहीच….पुणे हवामान विभागाची माहिती
पुणे दि.24 ( प्रतिनिधी ) राज्यात पावसामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस राज्यात आतापर्यंत झाला आहे. जून आणि ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. पुणे हवामान विभागाने पावसासंदर्भात
यानुसार आता या महिन्यात पाऊस नसणार आहे. सरळ सप्टेंबर महिन्यात पावसाचा अंदाज आहे. यामुळे शेतकऱ्यांनी नियोजन करावे, अशी सूचना पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी केले आहे.
काय आहे हवामान विभागाचा सल्ला
राज्यात गेल्या ८ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. आता ऑगस्ट महिन्याचा फक्त एक आठवडा राहिला आहे. या एका आठवड्यातही राज्यात पाऊस नाही. आता सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस होईल, अशी शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.