प्रेमात अडसर ठरतो…., पोटच्या गोळ्याचा आई व प्रियकरा कडून खून

जेजुरी, दि.२८ आई आणि तिच्या प्रियकराच्या प्रेमात अडथळा ठरणाऱ्या चार वर्षाच्या मुलाचा गळा दाबून खून केला.व त्याचे प्रेत पुरंदर तालुक्यातील माळशिरस जवळील भुलेश्वर घाटात फेकून दिले.ही घटना दीड महिन्यापूर्वी घडली,जेजुरी पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला असून दोघांना ताब्यात घेतले आहे.

खून झालेल्या मुलाचे नाव चुटक्या शंकर पवार वय ४ असून त्याची आई रेणू शंकर पवार वय २० व तिचा प्रियकर उमेश अरुण साळुंके वय २१ दोघे ही रा. मोडलींब ता. माढा, या दोघांना जेजुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मोडलिंब येथे राहणारे रेणू पवार आणि उमेश साळुंके यांच्यात प्रेम संबंध होते.या प्रेम संबंधात अडथळा ठरणाऱ्या चार वर्षाच्या चुटक्या या मुलाचा दोघांनी दीड महिन्यांपूर्वी गळा दाबून खून केला.खून केल्या नंतर त्याचे प्रेत साडीत गुंडाळून व पुरावा नष्ट करण्यासाठी दुचाकी गाडीवर घेवून येवून ते पुरंदर तालुक्यातील भुलेश्वर घाटात फेकून दिले. या बाबत रेणू पवार हिच्या चुलत बहिणीने पोलीस स्टेशन ला फिर्याद दिली.त्यानुसार जेजुरी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेवून घाटात फेकून दिलेल्या चिमुकल्यांच्या प्रेताचे अवशेष शोधून काढले आहेत.

सदरचे आरोपी पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे, सहाय्यक फौजदार चंद्रकांत झेंडे, पोलीस हवालदार दसरथ बनसोडे, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण शेंडे, पोलीस मित्र नानासाहेब घोगरे यांनी सोलापूर मोडनिंब येथून सिताफिने पकडले.
सदर दोघांवर जेजुरी पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मनोज नवसरे तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page