पुणे पोलीस दलात खळबळ….. पोलीस अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याची हत्या करून स्वतः ही आत्महत्या केली…

पुणे, दि. २४ ( प्रतिनिधी ) पुण्यात एक मोठी खळबळजनक घटना घडल्याचे समोर येत आहे.
एका बड्या पोलीस अधिकाऱ्याने स्वतःच्या पत्नीची आणि पुतण्याची गोळ्या घालून हत्या करून या हत्याकांडानंतर स्वतःलाही संपवलं आहे.
या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. भारत गायकवाड असं या पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून ते अमरावती पोलिस दलातील सहायक पोलिस आयुक्त आहेत.

पुणे शहरातीत चतुश्रुंगी परिसरात भारत गायकवाड यांनी त्यांची पत्नी मोनी आणि पुतण्या दीपक याच्यावर गोळीबार करून हत्या केली आणि त्याच पिस्तुलातून स्वतःवर सुद्धा गोळी झाडून घेतली. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. संपूर्ण प्रकारांची माहिती चतु:शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.भारत गायकवाड हे अमरावती पोलीस दलात सहायक आयुक्त म्हणून कार्यरत होते. तर त्यांचे कुटुंबीय पुण्यात वास्तव्याला होते.

भारत गायकवाड आपल्या पत्नीची आणि पुतण्याची हत्या करून नंतर स्वतःची आत्महत्या का केली? यामागे नेमकं काय कारण होते? हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. मात्र या संपूर्ण घटनेनं पोलीस दलात मात्र खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page