धक्कादायक…! बाप नव्हेच तो, वैरीच…. पोटच्या मुलीला बापाने फेकले नदीत…
शिरूर दि . २९ शिक्रापुर ता. शिरूर येथील बजरंगवाडीचे सिद्धीविनायक हॉस्पीटल शेजारून ७ वर्षाची मुलगी अपेक्षा युवराज साळुंके ही गायब झाल्याची तक्रार मुलीचे आईने रात्री नोंदवली व ही बातमी सोशल मिडीयाने सगळीकडे पसरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती . कालं ६ वाज ₹ताचे दरम्यान ही मुलगी हायवेलगतच्या आपल्या घरातून बाहेर पडली ते परत आलीच नाही म्हणून शिक्रापूर पोलीस स्टेशनला मुलीचे आईने तक्रार दिल्यावर सर्व पोलीस स्टेशनच युद्धपातळीवर कामाला लागले. पोलीस रात्रभर परिसरात इकडे तिकडे शोध घेत फिरले असता शेवटी चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मुलीचा बाप युवराज साळुंखे हाच मुलीला नदीकडे घेऊन जाताना फूटेजमध्ये दिसला, तेव्हा पोलिसांनी नदीच्या किनाऱ्यावर सगळीकडे शोधण्याचा प्रयत्न केला ,तेव्हा एका ठिकाणी मुलीच्या चपला आढळल्या पण पाणी जास्त असलेने मुलीला शोधण्यास अवघड जात होते . संशयावरून पोलिसांनी मुलीच्या बापाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने स्वतःच मुलीला वेळ नदीपात्रात पाण्यात फेकून दिल्याचे कबूल केले .शिक्रापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कामगिरी यशस्वी केली. एकीकडे सगळीकडे मुले पळवणारी टोळी कार्यरत असल्याच्या अफवा पसरल्या असल्यामुळे नागरिकांमध्ये जास्तच घबराहट पसरली होती .बापच मुलीचा काळ बनल्याने परिसरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
पुढील तपास शिक्रापूर पोलीस करीत आहेत.