राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांना निवासस्थानाचे वाटप
मुंबई, दि. २३ : शासनाकडून राज्य मंत्रिमंडळातील विविध मंत्र्यांना बंगला / निवासस्थानांचे वाटप करण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाने त्यासंदर्भातील शासन आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार विविध मंत्री आणि त्यांना वाटप करण्यात आलेली निवासस्थाने पुढीलप्रमाणे आहेत.
श्री. राधाकृष्ण विखे-पाटील (रॉयलस्टोन),
श्री. सुधीर मुनगंटीवार (पर्णकुटी),
श्री. चंद्रकांत (दादा) पाटील (ब-१ (सिंहगड),
श्री. विजयकुमार गावीत (चित्रकुट),
श्री. गिरीश महाजन (सेवासदन),
श्री. गुलाबराव पाटील (जेतवन),
श्री. संजय राठोड ( शिवनेरी),
श्री. सुरेश (भाऊ) खाडे (ज्ञानेश्वरी),
श्री. संदिपानराव भुमरे (ब-२ (रत्नसिंधु),
श्री. उदय सामंत (मुक्तागिरी),
श्री. रवींद्र चव्हाण ( अ-६ (रायगड),
श्री. अब्दुल सत्तार अब्दुल नबी (ब-७ (पन्हाळगड),
श्री. दीपक केसरकर (रामटेक),
श्री. अतुल सावे (अ-३ (शिवगड),
श्री. शंभूराज देसाई (ब-४ (पावनगड) आणि
श्री.मंगल प्रभात लोढा (ब- ५ (विजयदुर्ग).