जीवनात आलेल्या अनुभवांचा पुढील पिढीच्या मार्गदर्शनासाठी कार्यरत राहूणार -प्रा. दिलावर बागवान
जेजुरीतील माजी विद्यार्थी -विद्यार्थिनी ४८वर्षानंतर एकत्र, स्नेहमेळाव्याचे आयोजन
जेजुरी,दि .२३( प्रतिनिधी) जेजुरीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी विध्यालयातून ७३-७४ साली उत्तीर्ण होऊन पुढील जीवनात बँकिंग ,व्यापार ,उद्योग,प्रशासकीय अधिकारी ,व विविध क्षेत्रात कार्यरत राहून आता सेवानिवृत्त झालेले आहेत,असे जरी असले तरी ,माणूस कधीच सेवानिवृत्त होत नसतो तर जसेजसे वय वाढत जाते तसे जबाबदारी आणि कर्तव्य वाढत असते त्यामुळे ,आपापल्या क्षेत्रातील कार्याचा -अनुभवांचा फायदा आताच्या पिढीला व्हावा यासाठी सर्वजण कार्यरत राहणार असल्याचे प्रतिपादन माजी प्राचार्य दिलावर बागवान यांनी जेजुरी येथील स्नेहमेळाव्यात केले.
येथील विद्यालयातून सुमारे ४८वर्षांपूर्वी १०वि उत्तीर्ण झालेल्या सुमारे ३५ माजी विद्यार्थी -विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा रविवारी(दि.२१) आयोजित करण्यात आला होता.वयाची पासष्ठ वर्ष ओलांडलेले अनेक जण जुन्या बालपणीच्या आठवणीत रमले होते.यामध्ये प्राध्यापक , उद्योजक,कारखानदार ,डॉक्टर ,अभियंता ,वकील तर बरेचसे सेवानिवृत्त प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी, ,पोलीस अधिकारी आहेत.सर्वचजण आपापल्या क्षेत्रात प्राविण्य मिळवून सेवानिवृत्त झालेले आहेत.पल्या उद्योग ,व्यवसायानिमित्त मुंबई ,पुणे ,नगर ,सातारा ,तर कुणी थेट परदेशात असलेले गावच्या मातीच्या ओढीने आवर्जून उपस्थित होते.यामध्ये माजी पोलीस अधिकारी आनंद बेलसरे यांनी पोलिसी नोकरीतील अनुभव सांगितले.तर सतीश देशमुख यांनी बँकिंग क्षेत्रातील काही रंजक किस्से ऐकवले..कोणी गाणी म्हटली ,जुन्या कविता गप्पा ,थट्टा ,विनोद यांना काहींनी उधाण आणले. आपल्या जीवनातील वाटचालीचा यशाचा फायदा आताच्या पिढीला व्हावा त्यांचे सक्षमीकरण व्हावे.शहर व गडकोट डोंगररांगेत वृक्षारोपण ,उद्योग व्यवसायासाठी, प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणार असल्याचे नंदकुमार खाडे ,प्रदीप फाटक यांनी सांगितले .संगीता बुगदे ,कमल झगडे ,आत्माराम पेशवे ,किसन तिवाटणे, सुनील प्रभाळे,नंदकुमार कांबळे ,आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन उद्योजक उत्तम झगडे ,आणि मित्रपरिवाराने केले होते तर सुरेश पवार यांनी प्रास्ताविक केले.सूत्रसंचालन सदानंद बेलसरे यांनी तर आभार शोभा खाडे यांनी मानले.देवसंस्थानच्या वतीने सर्वाना खंडेरायाची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले.