बर्जर पेंट कंपनीने कामगार आंदोलन कामगारांच्या सुरक्षेची व्यवस्था करावी. पुन्हा अपघात नको – खा. सुप्रिया सुळे

जेजुरी. दि.४ ( प्रतिनिधी ) बर्जर कंपनीत झालेल्या अपघातात तरुण कामगाराचा मृत्यू झाला ही. दुर्देवी बाब आहे. या कुटुंबीयांना कंपनीने त्वरित आर्थिक मदत द्यावी,घरातील व्यक्तीला काम द्यावे,आणि महत्वाचे म्हणजे कामगारांच्या सुरक्षितते कडे कंपनीने लक्ष द्यावे. या पुढे कंपनीत एक ही अपघात झाला तर मी स्वतः हुन कंपनी बंद करेन असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला

. खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवार दि ४ रोजी जेजुरी येथील बर्जर कंपनीत झालेल्या अपघातातील मृत रोहित माने यांच्या कुटुंबीयांची राख गावी जावून भेट घेवून सांत्वन केले.त्यानंतर बर्जर कंपनी समोर कामगारांच्या सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला भेट देऊन कामगारांशी तसेच कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा केली. यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की या ठिकाणी आम्ही राजकीय भूमिका घेणार नाही.माणुसकीच्या नात्याने. मृत कामगाराच्या कुटुंबीयांना मदत मिळावी,कामगारांना न्याय मिळावा यासाठी आलो आहोत. कामगारांना सन्मानाने वागवा,त्यांना कंपनीत सुरक्षिततेची चांगली साधने उपलब्ध करून द्या,कामगारांना कायम स्वरुपी नोकरी दिली पाहिजे, लवकरात लवकर आर्थिक मदत करून कामगारांना न्याय द्या असे सांगितले.

 यावेळी पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा दिगंबर दुर्गाडे,पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील,उपाध्यक्ष संदीप चिकने,माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे,कात्रज दूध संघाचे संचालक तानाजी जगताप,बापूसाहेब भोर, माजी नगरसेवक मेहबूब पानसरे,काँग्रसचे गणेश जगताप,ईश्वर दरेकर कंपनीचे मॅनेजर राहुल नालगुने, ललित घोडके व मोठ्या संख्येनं कामगार वर्ग उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page