ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनीताई जगताप यांच्या हस्ते विविध संस्थांचा गौरव.
उघडा मारुती गणेश मंडळाचा उपक्रम
जेजुरी, दि ८ महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरीत नगरीत धार्मिक , सामाजिक, राजकीय,औद्योगिक, पत्रकारिता ,पोलीस आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थाचा जेजुरीयेथील उघडा मारुती मंडळाच्या वतीने गौरवचिन्हे देवून सन्मान करण्यात आला.
श्रींची आरती ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा. मा.राजवर्धीनीताई संजयजी जगताप यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच पंचायत समिती सदस्या मा.सुनिताकाकी कोलते, जेजुरीच्या मा.नगराध्यक्षा वीणाताई हेमंत सोनवणे, नगरसेविका रुक्मिणीताई जगताप, डाँ.सुमित काकडे व ३० महिला बचत गटांच्या महिला अध्यक्षा व पदाधिकारी भगिनी उपस्थितीत होत्या मंडळाच्या वतीने ३० बचत गटांचा सत्कार करण्यात आला.बाहेर पाऊस चालू असुनही महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी ग्रामीण संस्थेसही गौरविण्यात आले.
उघडा मारुती मित्र मंडळ गेली ४० वर्षे सामाजिक ,धार्मिक क्षेत्रात कार्यरत आहे. कोरोना काळात दोन वर्षे सर्व सामान्य,गरीब,अंध,अपंग,अनाथ बेघर माणसांना जगविण्याचे कार्य या मंडळाने केले. जेजुरीच्या आठवडे बाजारात झाडे लावून ओटे बांधून झाडांचे संरक्षण करण्याचे कामही हे मंडळ करीत आहे.
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून जेजुरी शहरातील विविध क्षेत्रात कार्य करणारे श्री मार्तंड देवसंस्थान,खंडोबा देवतालिंग कडेपठार ट्रस्ट. जानाईदेवी पालखी पदयात्रा अन्नदान मंडळ,संत नागू माळी सेवा ट्रस्ट, जेजुरी ,जेजुरी नगरपालिका, जेजुरी पोलीस स्टेशन,जेजुरी शहर पत्रकार संघ,जेजुरी उद्योजक संघ, शहरातील दहीहंडी मंडळ,बारा बलुतेदार विकास संघटना,ग्रामदैवत जानाईदेवी मंदिर जिर्णोधार समिती,स्वामीमय सेवा ट्रस्ट,प्रहार अपंग क्रांती संघटना,व्यसनमुक्ती संघटना,सुवर्णस्टार सोशल क्लब,श्री खंडोबा व कडेपठार मंदिरातील नित्य सेवेकरी ,जेजुरी शहर नागरिक हक्क कृती समिती आदी संस्थाचा सन्मान उघडा मारुती मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आला.
उघडा मारुती मंडळाचे अध्यक्ष सचिन सोनवणे,पदाधिकारी दादा मुलाणी,उमेश गायकवाड,अनिल पोकळे,अशोक भोसले,नितीन कदम,प्रथमेश जगताप,उमेश हराळे , गोविंद लाखे , सादिक बागवान आदींनी या उपक्रमाचे नियोजन केले.