कोविड पार्श्वभूमीवर जेजुरी देव संस्थांनकडून खबरदारी
कर्मचाऱ्यांना मास्क सक्तीचा
जेजुरी, दि. २५ जेजुरीच्या कुलदैवत खंडेरायाच्या मंदिरातील व्यवस्थापन पाहणाऱ्या मार्तंड देवसंस्थान समितीच्या अधिकारी -कर्मचारी वर्गाला मुखपट्टी (मास्क )बंधनकारक करण्यात आली आहे.मात्र देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी स्वतःची व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्यावी असे आवाहन मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप मंदिर व्यवस्थापनाने केली आहे.राज्यातील प्रमुख तिर्थस्थाने मंदिरे व गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढु नये.म्हणून प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत.याबाबत जिल्हाधिकारी पुणे यांचेकडून ज्या सूचना व आदेश येतील त्याचे तंतोतंत पालन करण्यात येईल. आवश्यक तेथे सेनेटायझर बूथ निर्माण करण्यात येईल. गडकोट आवारामध्ये सूचनाफलक लावण्यात येतील.भाविकांना सध्या मास्क वापरण्याची सक्ती नसली तरी गडकोट आवारात व गर्दीच्या ठिकाणी तो वापरावा असे आवाहन करण्यात येणार आहे.विशेषतः जेष्ठ नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी . प्रशासनाकडून पुढील आदेश -सूचना प्राप्त होतील त्याचे पालन करण्यात येईल यासाठी देवसंस्थान व्यवस्थापन कटिबद्ध असल्याचे संगणक विभागप्रमुख संतोष खोमणे यांनी सांगितले.