किर्लोस्कर नावाला काळीमा फासण्याचे काम करू नये. – कामगार नेते सुनील शिंदे
प्रतिनिधी
जेजुरी, दि. ४ जेजुरी येथील किर्लोस्कर फेरस कंपनीत कामगारांना कोणत्याही सुविधा दिल्या जात नाही.कामगारांचे शोषण होत आहे. कंपनीने किर्लोस्कर नावाला काळीमा फासण्याचे काम करू नये असे प्रतिपादन कामगार नेते सुनील शिंदे यांनी केले.
जेजुरी एमआयडीसीतील किर्लोस्कर फेरस कंपनीतील कामगारांचा मेळावा जेजुरी येथे पार पडला,या मेळावा प्रसंगी कामगार नेते व राष्ट्रीय मतदार संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे हे बोलत होते.
स्थानिकांनी स्वतःची कष्टाची जमीन ही कंपन्यांना दिलेली आहे त्यांनाच आता येथे तात्पुरते व कंत्राटी पद्धतीने काम करावे लागत आहे. या कामगारांना कामगार कायद्याच्या अंतर्गत असणारे कोणतेही फायदे सेवा सुविधा दिल्या जात नाहीत ही अत्यंत खेदाची व गंभीर बाब आहे किर्लोस्कर फेरस कंपनीतील कंत्राटी कामगारांना पगार स्लिप दिली जात नाही, कायद्याप्रमाणे वेतन दिले जात नाही, रजा दिल्या जात नाहीत, बोनस मिळत नाही, राष्ट्रीय सणांच्या सुट्ट्यांचा पगार कायद्याप्रमाणे दिला जात नाही, कंपनतील काम हे अत्यंत धोकादायक पद्धतीचे असून त्या ठिकाणी कामगारांना आवश्यक असणारी संरक्षणाची कोणतीही साधने दिली जात नाहीत. कामगारांना अपमान जनक वागणूक दिली जाते, कोणतीही चौकशी करायला गेले तर कामावरून घरी बसवले जाते अशा गंभीर समस्यांचा पाढाच यावेळी कामगारांनी मांडला .
अनेकदा संपर्क साधून चर्चा करून प्रश्न सोडवू असे सांगितले जाते. परंतु केवळ सर्व कामगार संघटित झाले संघटना केली म्हणून त्यांना कामावरून काढून टाकण्याचा, कामगारांना इतरत्र पिंपरी चिंचवड येथे बदली करण्याचा सपाटा या कंपनीने लावला आहे यामुळे कामगारांमध्ये यामुळे प्रचंड असंतोष पसरला असून या कामगारांना न्याय मिळवून देणारच असे सुनील शिंदे यांनी सांगितले .
या संदर्भामध्ये कामगार उपायुक्त कार्यालय पुणे येथे तक्रार दाखल करण्यात आली असून येत्या ७ जानेवारी रोजी व्यवस्थापन प्रतिनिधी येथील सर्व कंत्राटदार यांना या बैठकीला उपस्थित राहण्याबाबतचे समन्स जारी करण्यात आले आहे.
एमआयडीसी मध्ये राष्ट्रीय मजदूर संघातर्फे मोर्चा, बाईक रॅली व जेजुरीच्या मध्ये चौकामध्ये येथील कामगारांवर होत असलेल्या अन्याय बाबत फलक प्रदर्शित करणे असे विविध कार्यक्रम येत्या पंधरा दिवसांमध्ये करण्यात येणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले.
मेळाव्याचे सूत्रसंचालन संघटनेचे पुरंदर विभागाचे प्रमुख हनुमंत म्हस्के यांनी केले उपाध्यक्ष सिताराम चव्हाण यांनीही या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन केले.




