सद्या राज्यात असलेलं जातीयतेचे विष संमेलनाच्या माध्यमातून दूर करा : बाबाराजे जाधवराव
खानवडी येथे राज्यस्तरीय महात्मा फुले १६ वे साहित्य संमेलन संपन्न
जेजुरी दि. ४ आज समाजात प्रबोधन साहित्य संमेलनाची गरज आहे.
सद्या राज्यात असलेलं जातीयतेचे विष दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. हे थांबवायचे असेल तर छञपती शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा जागर झाला पाहिजे. अशा संमेलनाच्या माध्यमातून जातीयतेचे हे विष दुर करा असे आवाहन भाजपाचे पुरंदर हवेलीचे विधान सभा अध्यक्ष बाबाराजे जाधवराव यांनी केले.
खानवडी (ता. पुरंदर) येथे महात्मा फुले प्रबोधन १६ वे मराठी राज्यस्तरीय एक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाचे उद्घाटन बाबाराजे जाधवराव याच्य हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आले. तसेच महात्मा फुले स्मारकातील महात्मा फुले यांच्या अर्ध पुतळ्यास बाबाराजे जाधवराव व भाजपाचे तालुकाध्यक्ष निलेश जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी झालेल्या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवयिञी डॉ. स्वाती शिंदे -पवार या होत्या. तर स्वागताध्यक्ष भ.प.जगदिश महाराज उंद्रे व निमंत्रक सामाजिक कार्यकर्ते नितीन भागवत यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी पुरंदर तालुका भाजपा अध्यक्ष निलेश जगताप, कार्याध्यक्ष मयूर जगताप,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते बाळासाहेब भिंताडे, बंडूकाका जगताप,गणेश होले, प्रदिप जगताप, सिद्धाराम भुजबळ, लक्ष्मण धर्माधिकारी, श्रीकांत ताम्हाणे, जयप्रकाश घुमटकर, नाना ताथवडकर, उत्तम कामथे, अभिनेत्री हिंदवी पाटील,राजेंद्र काळे, अविनाश झेंडे, खानवडीच्या सरपंच स्वप्नाली होले,सोमनाथ कणसे, एस.एस.कोडीतकर, बाळूतात्या यादव,आप्पासाहेब भांडवलकर ,तुषार झुरंगे आदी उपस्थित होते.
संमेलनाध्यक्ष डॉ. स्वाती शिंदे- पवार म्हणाल्या, शब्दांच्या जीवावर आयुष्यात इतिहास जपता आला आहे. सर्वांनी एकमेकात मिसळायला शिकले पाहिजे. तरच शब्द जोडले जातील. या माध्यमातून लोकांच्यात जवळीक निर्माण होईल. शाळेतील दाखल्यावरील जात हा कॉलम रद्द करावा. यातुन समाजात मोठी क्रांती होईल.
महात्मा फुले मराठी प्रबोधन साहित्य संमेलनाचे संयोजन दशरथ यादव, राजाभाऊ जगताप, गंगाराम जाधव ,सुनील धिवार, दत्तानाना भोंगळे,सुनील लोणकर, संजय सोनवणे, दीपक पवार,शामकुमार मेमाणे, नंदकुमार दिवसे, रविंद्र फुले, दत्ता कड, दत्ता होले,छाया नानगुडे, संतोष दुबल आदींनी केले.
प्रास्ताविक दशरथ यादव यांनी केले. सूत्रसंचालन सुनिल लोणकर यांनी केले. तर आभार सुनिल धिवार यांनी मानले.