महिलांनी स्वतःकडे पाहताना आत्मसम्मान जपला पाहिजे. – उपजिल्हाधिकारी मीनल कळसकर
प्रतिनिधी
पुरंदर दि. १२ एकीकडे शासकीय पातळीवरून महिला सक्षमीकरणाचा प्रयत्न होतं असताना महिलांना असंख्य संधी निर्माण झालेल्या आहेत. मात्र सर्वासामान्य महिला या स्वतःला कुटुंब, नोकरी यातच गुंतून राहतात. महिलांनी स्वतःवर प्रेम करायला हवे. सार्वजनिक क्षेत्रात वावरताना स्वतःचा आत्मसम्मान जपला पाहिजे असे प्रतिपादन राज्यातील पहिल्या महिला तहसीलदार व उपजिल्हाधिकारी ( निवडणूक विभाग ) मीनल कळसकर यांनी केले आहे.
अनुसया चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त पुरंदर तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या अनुसया चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने आज ज्यांचा ज्यांचा सन्मान झालाय त्यांच्या जबाबदाऱ्या ही वाढलेल्या आहेत. विविध क्षेत्रात काम करताना भविष्यात अधिकाधिक यश मिळवण्याचा प्रयत्न करा.
ट्रस्ट च्या वतीने सुरेखा ढवळे (अपंग संघटना ) विमल भुजबळ (आदर्श सरपंच ) दक्षता मेमाणे ( पारगाव आदर्श व्यवसायिक )शोभा गरुड ( आदर्श शिक्षिका बेलसर ), धनश्री लोमटे (आदर्श भरत नाट्यम शिक्षिका सासवड ) सुनीता भादेकर ( आदर्श बचत गट मार्गदर्शन नीरा ), मीना शेंडकर ( आदर्श सामाजिक कार्यकर्ती, पिंपरी ), प्रभावती भूमकर (आदर्श राजकीय कार्यकर्ती आंबेगाव,हवेली ), सुशीला टेकवडे (आदर्श कुटुंब प्रमुख जवळार्जुन ), डॉ. उज्वला लाठी, (आदर्श डॉक्टर उरुळीकांचन ), अड सुवर्णा अहिरे आदर्श वकील ) यांना
शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी पुरंदर चे माजी आमदार अशोक टेकवडे यांनी अनुसया ट्रस्ट च्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. आईच्या नावाने सुरु केलेल्या या ट्रस्ट च्या माध्यमातून विविध क्षेत्रातील नामवंतांचे सन्मान, आरोग्य शिबीरे, गरजूना मदतीचा हात, तसेच सामाजिक उपक्रम राबवले जात असतात. असे सांगितले.अनुसया चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष अजिंक्य टेकवडे, अजित मल्टीस्टेट को. क्रेटीड सोसायटीच्या अध्यक्षा विजया टेकवडे, पत्रकार बी एम काळे, सूत्रसंचालक स्वानंद लोमटे तसेच सन्मानार्थीचीही भाषणे झाली.
कार्यक्रमाला अनुसया नागरी सह. पतसंस्थेचे सतीश जाधव, आदर्श कृषीरत्न महादेव शेंडकर, बळवंत गरुड गुरुजी, युवा नेते गणेश मेमाणे, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन अनुसया नागरी सहकारी पतसंस्था, अनुसया मल्टी स्टेट व अजित मल्टी स्टेट को ऑप सोसायटी च्या वतीने करण्यात आले होते.
स्वागत अजिंक्य टेकवडे यांनी केले. सूत्रसंचालन निखिल जगताप यांनी तर आभार बी. एम. काळे यांनी मानले




