कृषीपुणेपुरंदरमहसूलसामाजिक

पुरंदर विमानतळ जमीन अधिग्रहण, दर ठरला. एकरी १ कोटी ६१ लाख रुपये देणार, एकूण २ कोटीवर मोबदला janarw

प्रतिनिधी

पुरंदर, दि. ६ प्रस्तावित पुरंदर विमानतळाच्या जमीन अधिग्रहणासाठी सरकारने दर जाहीर केले आहेत. या प्रकल्पासाठी एकरामागे १कोटी ६१ लाख १ हजार ९२५ रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली. तसेच या प्रकल्पात ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्यात येणार आहे. तर शेतकऱ्याकडून घेण्यात आलेल्या जमिनीपैकी १० टक्के जमीन विकसित भूखंड शेतकऱ्याला परत केला जाणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे.
पुरंदर विमानतळाच्या या प्रकल्पासाठी पुरंदरमधील सात गावांमध्ये मिळून एक हजार २१६ हेक्टर जमीन तर इतर २४२ एकर जमीन अधिग्रहित करण्यात येणार आहे. या गावांमधील शेतकऱ्यांना व्याजासहित एक एकरला १ कोटी ५१ लाख १ हजार ९२५ रुपये एवढा दर देण्यात येणार आहे. १० जूनपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. ज्याची सहमती असेल त्यांना पैसे दिले जातील, जे सहमती देणार नाहीत त्याची सक्तीने भूसंपादन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

सात गावातील क्षेत्र किती पुढीलप्रमाणे

उदाचीवाडी – ५८.३४ हे.आर
वनपुरी – १५४.०६ हे.आर
कुंभारवळण – २४५.४८ हे.आर
खानवडी – ३६९.२२ हे.आर
मुंजवडी – ८२.५६ हे.आर
एखतपूर – १९९.०३ हे.आर
पारगाव – १८८.०७ हे.आर

मोबदला दर पुढीलप्रमाणे
२४ एप्रिल २०२६ रोजी प्रधान सचिव (उद्योग) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मोबदल्याचे दर निश्चित करण्यात आले आहेत
प्रति हेक्टर मूळ दर: ९४,९४, ०६० रुपये
गुणांकानंतर दर: १,८९,८८,१२० रुपये
१००% दिलासा: १,८९,८८,१२०. रुपये
एकूण मोबदला (प्रति हेक्टर): ३,७९,७६,२४० रुपये
प्रति एकर मोबदला: १,५१,९०,४९६ रुपये
१२% अतिरिक्त रक्कम: ९,११,४२९ रुपये
एकूण प्रति एकर १,६१,०१,९२५ रुपये

इतर मोबदला
जमिनीव्यतिरिक्त खालील घटकांसाठी स्वतंत्र मोबदला देण्यात येणार आहे:

फळझाडे
आंबा: ५०,००० ते ६०,०००रुपये
सिताफळ: ११,००० ते १३, ००० रुपये
अंजीर: १०,००० ते १३००० रुपये
नारळ: ४००० ते ६,००० रुपये
चिंच: ४०,०००० ते ५०,०००रुपये
चिकू: १३००० ते १७, ००० रुपये
वनझाडे
बाभूळ: ४८९९ रुपये
कडूलिंब: ६३९२ रुपये
बोर: २०४४ रुपये
निलगिरी: ११, ७८३ रुपये
पिंपळ / वड / करंज:
२१९८९ रुपये
उंबर : ११७८३ रुपये
इतर

विहीर: ३ ते १७ लाख
बोअरवेल: ४०,००० ते ६०,०००रुपये
पक्के घर: ३ लाख ते ४० लाख क्षेत्रफळानुसार ( ५७०० प्रति चौरस मीटर)
वरील सर्व घटकांच्या मूल्यावर १०० टक्के दिलासा देऊन दुप्पट मोबदला दिला जाणार आहे.
विशेष मोबदला
१० टक्के विकसित भूखंड परतावा (अटीनुसार)
जमीनधारकांना ७५० दिवसांची मजुरी
अल्पभूधारकांना ५०० दिवसांची मजुरी
घर स्थलांतर: ४०००० रुपये
गोठा स्थलांतर: २०,००० रुपये
मोबदला RTGS द्वारे थेट खात्यात जमा होणार
मोबदला करमुक्त राहील
७/१२ वरील खातेदारांनी ७ दिवसांत हरकती सादर कराव्यात
आवश्यक कागदपत्रे: आधार, पॅन, बँक खाते, फोटो इ
संमती करार न केल्यास सक्तीने भूसंपादन करण्यात येईल व काही लाभ मिळणार नाहीत. असे ही जिल्हाधिकारी श्री डुडी यांनी सांगितले आहे.
साधारणपणे इतर मोबदला धरून शेतकऱ्यांना २ कोटींपेक्षा जास्त मोबदला मिळत असला तरी ही जनावरांचे काय होणार असा प्रश्न ही विचारला जात आहे.
दरम्यान,आम्ही आमची इंच भर ही जमीन प्रकल्पाला देणार नाही अशीच भूमिका या सात गावातील अनेक शेतकऱ्यांनी मांडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page